Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

किरण वाघ बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

Responsive Ad Here
 राजगृह परिसरात घडलेल्या  घटनेच्या निषेधार्थ  समतेचे निळे वादळ संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मार्फत  मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

                  भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेले राजगृह या निवासस्थानावर दिनांक 7/7/2020 रोजी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली.  यात घराच्या परिसरातील सी सी टी व्ही तसेच तावदान व इतर महत्त्वपूर्ण वस्तूंची करण्यात आलेली आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास स्थान असून जगभरातील नागरिक येथे दररोज भेट देण्यासाठी येतात राजगृह हे आंबेडकर अनुयायांचे पेरणास्थान अस्मिता असल्यामुळे तमाम जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.  या घटनेचा  मलकापूर तालुका समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटने च्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला सदर कृत्य करणाऱ्या माथेफिरु समाजकंटक आरोपीला तात्काळ अटक करून कारवाई करावी व या घटनेचे खरे सूत्रधार शोधून काढावे अशी मागणी केली आहे.
                सदर निवेदना वर राजेंद्र पवार तालुका अध्यक्ष, दिलीप इंगळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख  , दीपक मेश्राम , मोहन खराटे,  प्रभाकर इंगळे , पंकज मोरे , विनोद झनके यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.