Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अआनिसचे राहाता तहसीलदारांना निवेदन....

Responsive Ad Here
        
राहाता (प्रतिनीधी) : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ या निवासस्थानी समाजविघातक व मनुवादी विकृत मानसिकता असलेल्या लोकांकडून झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून या विघातक मानसिक वृत्तीच्या आरोपींचा शोध घेऊन राज्य सरकारकडून कठोरात कठोर कार्यवाही केली जावी अशा मागणीचे निवेदन मा.रवींद्र दादा जाधव साहेब( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) यांच्या मार्गद्शनाखाली व मा.निखिलभाऊ भोसले( अहमदनगर युवक जिल्हा अध्यक्ष ) यांच्या नेतृत्वाखाली
   राहाता तालुकाध्यक्ष (युवक आघाडी)मा.शाम गाडेकर यांनी तहसीलदार कुंदन हिरे यांना दिले
             या निवेदनात असे म्हटले आहे की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील ‘राजगृह’ निवासस्थान हे देशातील तमाम जनतेसाठी बौध्दासाठी एक महत्वाचं ऊर्जा केंद्र आहे. या निवासस्थाची केलेली तोडफोड ही अत्यंत निंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात खोलवर रुजलेले आहे. त्यामुळे कोणतीही मनुवादी विघातक मनोवृत्ती हे विचार कदापी संपवू शकत नाही. त्यामुळे अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन केल जावे. तसेच जिल्ह्य़ातील महिला बचत गटाला फायनान्स कंपनी मार्फत कर्ज वितरीत केले जाते. कोरोणा लाॅकडाऊन व संचारबंदी कालावधीत महिलांना रोजगार व कामधंदा नसल्याने त्या फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता व व्याज भरुन शकत नाहीत. शासन परिपत्रकानुसार लाॅकडाऊन संचारबंदी कालावधीतील महीन्यात बँकेकडून व फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या बचत गटाचे कर्ज हप्ते व व्याज माफ करण्यात यावे. हे महीने वगळुन हप्ते भरण्याची मुभा देण्यात यावी.
यावेळी युवा कार्याध्यक्षा राहाता तालुका शबिस्ताजी सय्यद ,पवन शेजवळ राहाता तालुका सरचिटणीस ,तसेच शिर्डी शहराध्यक्ष मा.राहुल जाधव आदी उपस्थित होते