गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल शहरातील तमाम नागरिकांना याद्वारे कळविण्यात येते कि, गुरुवार दि . ०९/०७/२०२० रोजी सकाळी ६ . ०० वाजेपासून ते सोमवार दि. १३/०७/२०२० रोजी संध्याकाळी ६. ०० वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे . ह्या कालावधीत शहरात औषध विक्री ,कृषी केंद्र ,व दवाखाने सुरु राहतील तसेच दूध विक्री करणाऱ्यांनी घरपोच सेवा पुरवावी .या व्यतिरिक्त सर्व दुकाने व आस्थापने बंद राहतील . याची नागरिकांनी नोंद घ्यावी . तसेच मा. जिल्हाधिकारी सो .
जळगाव यांच्या आदेशा नुसार जिल्ह्यात भारतीय दंड विधान कलाम १४४ नुसार जमाव बंदी कायदयाची अंबलबजावणी सुरु आहे . तसेच भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार आपत्ती व्यवस्थापन कायदाही लागू केलेला आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी .विनाकारण कोणीही घरा बाहेर पडू नका. घाबरून जाऊ नका काळजी घ्या प्रशासन तुमच्या सोबत आहे धन्यवाद.
