Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नवीन शाखेच्या इमारतीचे भूमिपूजनकृषी विकासात अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे योगदान मोठे - महसूल मंत्री नामदार थोरात

Responsive Ad Here
आकाश जाधव @ शिर्डी प्रतिनिधी 

अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. सहकारासह विविध क्षेत्राच्या विकासासाठी अर्थ पुरवठा करण्याचे काम जिल्हा बँक करते. शिस्त व काटकसर हे बँकेचे वैशिष्ट्य असून कृषी क्षेत्रासह जिल्ह्याच्या विकासात अहमदनगर जिल्हा बँकेचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.संगमनेर येथे नगरपालिकेसमोर जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सोशल डिस्टन्सींगचे पालन करून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सीताराम पा. गायकर हे होते तर व्यासपीठावर 


आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, बँकेचे उपाध्यक्ष रामदास पाटील वाघ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी बापूसाहेब गिरी होते.याप्रसंगी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि जिल्हा बँकेचे अतूट नाते होते. सुमारे 45 वर्षे बँकेचे संचालक व पंधरा वर्षे अध्यक्ष राहिलेल्या सहकारमहर्षी आदरणीय भाऊसाहेबांनी अत्यंत काटकसर व पारदर्शकतेतून बँक राज्यात नावारूपास आणली. आज तीच परंपरा बँकेने कायम ठेवली असून ही बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू ठरली आहे.  शेतकऱ्यांच्या हक्काची बँक अशी ओळख निर्माण झाली असून बँकेने एक लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवले आहे. शासनाने दिलेल्या कर्जमाफीचा बँकेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. संगमनेर, अकोले तालुका दरवर्षी जवळजवळ शंभर टक्के कर्ज वसुली देत असून एक चांगली परंपरा तालुक्यात आहे गोरगरिबांच्या व सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून होत असून, बँक हीच परंपरा पुढे कायम ठेवेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.सिताराम पा. गायकर म्हणाले की, जिल्हा बँकेच्या जडण घडणीत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व संगमनेर तालुक्याचा मोठा वाटा राहिला आहे. आज राज्यात नव्हे तर देशात या बँकेचा मोठा लौकिक निर्माण झाला आहे. सध्या बँकेत 7 हजार 700 कोटी रुपयांच्या ठेवी असून चार हजार पाचशे कोटींचे कर्जवाटप करण्यात आले


 आहे. पीक कर्ज वाटप करणारी राज्यातील सर्वात मोठी बँक म्हणून अहमदनगर जिल्हा बँकेने नाव मिळवले आहे. बँकेची नव्याने होणारी इमारत शहराच्या वैभवात भर टाकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, शिवाजीराव थोरात, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, भारत शेरकर, गुलाबराव ढोले, सरव्यवस्थापक जयंत देशमुख, सुरेश पाटील, अशोक थोरात, रमेश मंडलीक, भगीरथ डोईफोडे बाळासाहेब चौधरी, भाऊसाहेब कोटकर, किशोर खेमनर  आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत तालुका विकास अधिकारी बापूसाहेब गिरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. बँकेचे उपाध्यक्ष रामदास पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.