शिवदास सोनोने
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने दिनांक 20 जुलैला पंचायत समिती जळगाव जामोद बी.डी.ओ.ला संपूर्ण तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले मंत्रिमंडळाचे ठरावानुसार माननीय राज्यपाल यांनी 2020 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दहा नुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत मध्ये अधिकारी प्रशासन न ठेवता गावातील नागरिक प्रशासक नियुक्त करावा हे नमूद आहे गावातील नागरिक प्रशासक नियुक्त करताना स्थानिक पत्रकारांना संधी देण्यात यावी पत्रकार हा सर्वांना सोबत घेणारा बुद्धिजीवी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे याकरिता त्याच गावातील स्थानिक पत्रकारावर ग्रामपंचायतच्या प्रशासक पदाची जबाबदारी सोपविली तर गाव विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते यामुळे नियुक्ती होणाऱ्या अधिकारी प्रशासन असलेले ग्रामपंचायत स्तरावर त्यांनी पत्रकारांना प्रशासकाची संधी द्यावी याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री उद्धवजी ठाकरे माननीय श्री हसन मुश्रीफ ग्राम विकास मंत्री यांना पत्रकार संघाचे केंद्रीय कार्यकारी मनोहर सुने राष्ट्रीय अध्यक्ष, सुरेश सवळे राष्ट्रीय सरचिटणीस , कैलास बाप्पू देशमुख महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी पाठविले आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे विचारांना यामुळे चालना मिळेल या करिता ग्रामपंचायत वर पत्रकारांना प्रशासक नेमावे या मागणीकरिता स्थानिक पंचायत समिती बी.डी.ओ.ना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.निवेदनावर तालुका अध्यक्ष गोपाल मनोहर अवचार, तालुका उपाध्यक्ष अनिल भगत ,शहराध्यक्ष अमोल भगत, राजेश बाठे, जिल्हा संघटक अश्विन राजपूत,राजकुमार भड, मनीष ताडे, शिवदास सोनोने, विनोद चिपडे, गणेश भड,विनोद वानखडे,मंगेश राजनकर यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.

