राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर प्रशासक बनविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात काम करून गावाची तसेच परिसरातील समस्या वर्तमान पत्राच्या माध्यमातून मांडण्याचे काम पत्रकार हे करीत असतात. पत्रकारांना गावातील समस्यांची जाण असून त्याचबरोबर गावासह परिसरातील भौगोलिक, सामाजिक, राजकीय अभ्यास असतो. शिवाय सर्वच राजकीय पक्षांतील लोकांबरोबर चांगले संबंध असतात. प्रशासनाबद्दल पत्रकारांना चांगली माहिती असतात. पत्रकारांचा जनसंपर्क पणं खूपच दांडगा असतो. त्यामुळे ग्रामपंचायतच्या कामात पारदर्शकता येऊन गावाचा विकास योग्यरीत्या होईल.
तेव्हा या सर्व बाबींचा विचार करून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून त्या त्या गावच्या मतदार असलेल्या पत्रकाराची निवड करावी. अशी मागणी द पावर ऑफ मीडिया फाउंडेशन या पत्रकार संघटनेने नांदगाव खंडेश्वर येथिल गटविकास अधिकारी यांच्यामार्फत यांना केली आहे. निवेदन देतेवेळी पावर ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे, जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत झोपाटे, नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे, सचिव सागर सव्वालाखे, प्रदीप रघुते, संदेश ढोके, अनिकेत शिरभाते, उमेश चौकडे, गजानन भस्मे, शिवाभाऊ उईके, नरेंद्र देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते.

