नांदुरा/प्रतिनिधी :नांदुरा येथील एम आय एम च्या पदाधिकाऱ्यांनी यांनी नांदुरा येथील तहसीलदार यांना आज दि.२० जुलै २०२० रोजी निवेदन दिले आहे. देशासह संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या महामारी मुळे भयानक संकट समोर उभे ठाकले आहे. यामुळे मध्यमवर्गीय व सर्व मजूर वर्गांना हाताला काम धंदा नाही. अशातच त्यांना दोन वेळचे जेवण मिळणं सुद्धा कठीण झाले आहे. तर ते लाईट बिल कुठून भरणार याकरिता आज नांदुरा एमआयएम च्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन एम एस ई बी विभागाकडे सुपूर्द केले आहे.व जनतेचे विद्दयुत मीटर कट करू देणार नही व येत्या पंधरा दिवसात वीज बिल माफ न केल्यास एम आय चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एमएसईबी कार्यालयासमोर निदर्शने करतील. व होणाऱ्या सर्व परिणामांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी. असे सदर निवेदनात नमूद आहे. यावेळी AIMIM शहर अध्यक्ष नांदुरा गफुर अहमद शेख,शहर महासचिव
असीम खान पठान, अमीर सोहेल, इस्हाक़ खान, फ़िरोज़ खान, शेख रफ़ीक़, सैय्यद शफी, अमीन खान, शेख आरिफ ,शेख हामिद व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

