Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सार्वजनिक ठिकाणी घोषवाक्य लिहून कोरोना जनजागृती

Responsive Ad Here
प्रतिनिधी शेगाव पवन चव्हाण

मोताळा_ युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलढाणा मार्फत मागील बऱ्याच दिवसापासून कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रकारचे कार्य राष्ट्रीय युवा स्वयंसेवक यांच्या माध्यमातून करत आहेत. सोशल डिस्टनस,व्हाट्सप ऍपच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगले संदेश पोहोचवणे व सार्वजनिक ठिकाणी
होत असलेली गर्दी टाळणे असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.यायचं एक भाग म्हणून स्वप्नील क्षिरसागर आणि प्रतीक जोहरी राष्ट्रिय युवा स्वयंसेवक यांनी मोताळा येथील बस स्थानक, ग्रामीण रुग्णालय तसेच सार्वजनिक ठिकाणी घोषवाक्य लिहून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य हाती घेतले आहे. व लोकांपर्यंत कोरोना संबंधित संदेश


पोहोचविण्याचा त्यांचा मानस आहे. जिल्हाधिकारी कार्यालय स्वयंसेवक म्हणून नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांना ओळखपत्र ही देण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक स्वप्नील क्षिरसागर यांनी राबविला उपक्रम.