प्रतिनिधी@पवन चव्हाण
संग्रामपुर : तालुक्यातील मका खरेदी केंन्द्र तत्काळ सुरू करा अन्यथा नोंदनिकृत १७५० शेतकर्यांचा हजारो किंट्टल मका तहसील कार्यालयाच्या आवारात टाकुन स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेत्तृत्वात आंदोलन करणार असल्याचा ईशारा आज दिनांक २७ जुलै रोजी स्वाभिमानीचे रोशन देशमुख, युवा जिल्हाध्यक्ष अंनता मानकर सह शेतकर्यांनी दिला आहे. शासनाने राज्यात नाफेडव्दारे मका खरेदी केंद्र चालु केले आहेत पंरतु संग्रामपुर खरेदी विक्री संघ यांचेकडे गोडाऊन उपल्बध नसल्याने अद्यापही मका खरेदी केंद्र चालु नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. शासन ३१ जुलै पर्यंतच मका खरेदी करणार असल्याने तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा मका घरातच पडुन राहते कि काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामधे निर्माण झाला आहे. त्यामुळे संग्रामपुरात खरेदी केंद्र बंद ठेउन हा एक प्रकारे मका उत्पादक शेतकर्यांनवर अन्यायच झालेला आहे. हे स्पष्ट आहे. या प्रश्नाना बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढकार घेऊन तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. तहसिलदार राठोड यांनी निवेदनाची गांभिर्याने दखल घेऊन तत्काळ गोडाऊन उपलब्ध करुन ख.वि.स.ने मका खरेदी सुरु करा. अन्यथा २९ जुलै रोजी तालुक्यातील सर्व १७५० शेतकरी हजारो किंटल मका तहसील कार्यालयात आणुन आंदोलन करणार असल्याचा ईशारा. निवेदनातुन देण्यात आला आहे.यावेळी स्वाभिमानीचे रोशन देशमुख, युवा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर,प्रमोद वानखडे, प्रितेश साखरे, गोपाल गोतमारे, श्रीकृष्ण गाडंगे, अजाबराव निंबोळकर ,सुपडा सोनोने,मनोज गोतमारे,किशोर डाबरे, रामकृष्ण धनोकार,महादेव शेळके,सुनिल ढगे, संतोष साखरे,अनंता आमले,पुरूषोत्तम साखरे, रामेश्वर गाडगे, सुरेश गाडगे, मगेश गाडगे,रा.डाबरे,पंकज डाबरे,पंढरीनाथ ढगे, दिनेश धुर्डे,मनोज साखरे, सह बहुसंख्य शेतक-यांनी निवेदनातुन दिला आहे.

