अमरावती प्रतिनिधी @ राजू कलाने
आज पासून १० ते १५ दिवस अगोदर गावं रायपूर ता.चिखलदरा जिल्हा अमरावती येथील गोपाल येवले यांची ३० म्हसी वनविभागाने D.F.O. एन. शिवबाला यांच्या नेतृत्वात सिपना वन्यजीव कार्यालय, परतवाडा येथे आणले आणि दिनांक ०८/०७/२०२० ला वनविभाग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका म्हसीचे मृत्यू झाले.
हिच घटना मेळघाटातील आदिवासी, गवळी किंवा इतर शेतकरी बांधवांचा शेतात वन्य प्राणी मृत्यू पावल्यास वन्यजीव अधिनियमांतार्गत संबंधित शेतकऱ्यावर वन विभाग प्रशासन गुन्हे दाखल करतात. मागिल वर्षीच्या घटना वर्ष २०१९ मध्ये धारणी तालुक्यातील दादरा गावातील एक आदिवासी शेतकरी शेतातून परत येत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि सदर हल्ल्यामध्ये त्या शेतकऱ्याचे जागीच मृत्यू झाले. तेव्हा कोणत्याही जबाबदार वन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल का करण्यात आले नाही? किंवा हलगर्जीपणा बद्दल कोणत्याही प्रकारची कारवाई का करण्यात आली नाही? वन्यजीवा सोबतच स्थानिक लोकांनाही हिंस्र प्राण्यापासून संरक्षण देण्याची जबाबदारी वनविभागाची आहे.त्या वेळी काही स्थानिक नेत्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची चापलूसकी केली त्यांना संरक्षण दिले. तेव्हा स्थानिक नेत्यांनी कठोर भुमिका घेतली असती? तर आज ही वेळ आली नसती!
आमची मागणी आहे की संबंधित Divisional forest officer एन.शिवबाला, सिपना वन्यजीव विभाग,यांच्यावर गुन्हे दाखल करून हलगर्जीपणा बद्दल सविस्तर माहिती कोर्टासमक्ष देण्यात यावी.
येणाऱ्या काळामध्ये वनविभागाच्या तानाशाही प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी मेळघाटातील १५० गावातील प्रतिनिधी मिळून प्रेस कॉन्फरन्स केला जाईल आणि lockdown संपल्यानंतर लाखोंच्या संख्येने वन विभागाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल.
आम्हाला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब मेळघाट वासियांना मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन करून मेळघाटात जंगल राज चालवून पाहणाऱ्या वनविभागावर अंकुश लावेल.यावर
मन्नालाल दारसिंबे अध्यक्षपारंपरिक ग्रामसभा संघटना,मेलघाट तथा महासचिव जय आदिवासी युवा शक्ती (जयस) महाराष्ट्र प्रदेश.यांनी वनविभाग यांच्यावर आरोप केला आहे.

