शिवदास सोनोने प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा
बुलडाणा : लॉकडाऊनच्या शुकशुकाटात संधी साधून चोरट्यांनी तब्बल ११ मोटारसायकली लंपास केल्या होत्या.ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी ३ जूलै रोजी २ चोरट्यांचे मुसके आवळले असून इतर ४ आरोपींचा शोध सुरु आहे. सागर प्रताप वाघ २० वर्ष, विनोद कैलास शेवाळे २७ वर्ष रा. साखळी ता. जि. बुलडाणा अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याची माहीती ठाणेदारांना मिळली होती. दरम्यान सदर चोरटे बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात असल्याची ही
माहीती मिळाल्याने पोलिसांनी आरोपींना त्यांच्या कडे असलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस केली असता, त्यांनी खोटी माहीती दिली. सदर गाडी चोरी गेल्याची तक्रार जाफराबाद पो. स्टे. ला दाखल होती.पोलीसी खाक्या दाखविताच संशयीत आरोपी मंगेश दादाराव पोकळघट रा. साखळी खुर्द, अभिमन्यू रामा मंडाळकर, नंदू सुखदेव मृदमाळी, रवि दत्ता निकम सर्व रा. साखरखेर्डा यांचे कडून ११ मोटारसायकली घेतल्याची कबूली दिली आहे. दरम्यान आरोपी मंगेश पोपळघट याच्याकडून १o व वरील आरोपीकडून १ अशा ११ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.४ आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

