Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जनता विद्यालय,पवननगर सिडको चा एस एस सी परीक्षेचा निकाल १००%

Responsive Ad Here

योगेश गोसावी @नाशिक


       मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील जनता विद्यालय, पवननगर सिडको चा मार्च २०२०चा एस एस सी परीक्षेचा शेकडा निकाल १००% लागला असून परीक्षेला ३४३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात विशेष प्राविण्य २३६ विद्यार्थी ,प्रथम श्रेणीत ९१ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत १३ विद्यार्थी व तृतीय श्रेणीत ०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
        विद्यालयात प्रथम येण्याचा मान बागुल शुभांगी महेश हिने मिळवला तिला शेकडा ९७.४० गुण मिळाले,द्वितीय शिरोडे मृणाली विलास हिस शेकडा ९७.०० गुण मिळाले,तृतीय मोरे स्वप्निल राजेंद्र शेकडा ९६.६० गुण मिळाले,चौथा पगार प्रतिक भारत यास शेकडा ९६.४० गुण मिळाले तर पाचवा नंबर कदम सचिन गणेश व चौधरी स्विटी वसंत यांना  शेकडा ९५.६० गुण मिळाले.
            सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डाॅ.तुषार शेवाळे,सरचिटणीस निलीमाताई पवार,सभापती माणिकराव बोरस्ते,उपसभापती राघो नाना आहिरे,चिटणीस डाॅ. सुनिल ढिकले, नाशिक शहर तालुका संचालक नानासाहेब महाले,नाशिक ग्रामिणचे संचालक सचिन पिंगळे तसेच सर्व संचालक मंडळ,शालेय समिती अध्यक्ष दत्ताकाका पाटील व सर्व सदस्य, मविप्रचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ.संजय शिंदे,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना सोनवणे, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.