Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धनगर समाजाच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेळ्या-मेंढ्या मुलाबाळांसह धरणे आंदोलन करन्याचा रासप व शिव अहिल्या शासन संघटना चा इशारा

Responsive Ad Here

शिवदास सोनोने


धनगर समाजाच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दी 10/8/2020 रोजी शेळ्या मेंढ्या मुलाबाळांसह धरणे आंदोलन करन्याचा रासप व शिव अहिल्या शासन संघटना चा इशारा बुलढाणा जिल्ह्यातील धनगर  समाजाच्या वंशपरंपरागत शेळी व मेंढी पालन करणाऱ्या धनगर मेंढपाळ बांधावावर कोरोना महामारी मुळे सध्या नैसर्गिक संकट आलेले आहेत त्यात आणखीन भर म्हणून वन विभागाकडून मेंढपाळांवर चराई बंदी घालण्याचे प्रकार झाले आहे त्यामुळे मेंढपाळ बांधवावर उपासमारीची वेळ येऊन त्यांना पोटावरून उठण्याचा प्रकार झाला आहे तरी या संदर्भात माननीय वन अधिकारी साहेबांनी लक्ष घालून  पिढीजात शेळी मेंढीपालन व्यवसाय करणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांना उपजीविकेचे दृष्टीने चराईसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.

 मेंढपाळ बांधवावर अशाच प्रकारचा अन्याय होत राहिल्यास राष्ट्रीय समाज पक्ष व शिव अहिल्या शासन संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच वेळोवेळी निवेदन देऊन निवेदन याचा विचार न केल्यामुळे नाईलाजास्तव आता covid-19 च्या नियमाचे पूर्णतः पालन करून शेळ्या-मेंढ्या मुलाबाळांसह जील्हा वन अधिकारी कार्यालयापासून मोर्चा काढून जील्हा अधिकारी कार्यालयासमोर दी 10/8/2020 रोजी  धरणे आंदोलन करन्याचे ठरविले आहे. तसेच वेळप्रसंगी उपोषण सुद्धा करण्यात येईल येईल तरी सदर निवेदनाचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी  शिव अहिल्या शासन संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ गीता सोनोने, विदर्भ अध्यक्ष शिव अहिल्या शासन  नंदू लवंगे  व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनश्री ताई काटीकर पाटील यांनी सदर निवेदनाद्वारे केली आहे.