तिसऱ्या वर्षीही विद्यालयाने १०० टक्के निकालाचा विक्रम नोंदविला व प्रथम ४ हि मुलीनी मारली बाजी
अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालयाचा १० वी चा निकाल १०० टक्के लागला त्या मध्ये पहिल्या तीन मध्ये मुलींनी बाजी मारली असून सलग *तिसऱ्या वर्षीही विद्यालयाने १०० टक्के निकालाचा विक्रम नोंदविला. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.अंदरसूल येथील शेतकरी संजय जाधव यांची मुलगी कु. निकिता संजय जाधव हिने नेहमी घरकाम व शेती कामात आई वडिलांना मदत करून कुटुंबाला हातभार लावत मिळालेल्या वेळेचा सदुउपयोग करून ९२.८० टक्के गुण मिळवून विद्यालयातून पहिला येण्याचा मान मिळविला तर कु. समृद्धी सचिन देशमुख या विद्यार्थिनीने ९१.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकने यश संपादन केले. कु. श्रुती भगवान गायकवाड या विद्यार्थीनीने हि ९१.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात तिसरी कु.अंजली अविनाश जाधव या विद्यार्थिनीने हि ९०.०० टक्के गुण मिळवून चौथी तर कु.हर्षद सुभाष चिकने या विद्यार्थ्याने ८८.८० टक्के गुण मिळवून पाचवा आला आहे. यश संपादन केले
या सर्व गुणवंतांचा सत्कार मान्यवर संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, सरचिटणीस अॅड सुभाषराव सोनवणे, संचालक मकरंद सोनवणे, अमोल सोनवणे, राजेंद्र गायकवाड, आदींच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी विलास गाडे, जीवन गाडे, सुदाम सोनवणे, सरपंच विनिता अमोल सोनवणे, सचिन बागुल, डॉ कुलदीप बागल, आकाश सोनवणे, रामनाथ काका एंडाइत, तसेच प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, मुख्याध्यापक अल्ताफ खान, सागर गाडेकर, गणेश सोनवणे, संतोष जाधव, गायकवाड तुकाराम, अमोल आहेर, दिपक खैरनार, प्रशांत बिवाल, सागर घोडके, जालिंदर म्हस्के, अझर खतीब, माळी माधुरी, आदीं उपस्थित होते.
