प्रतीनिधी@ विनोद कोते
सोयगांव तालुक्यातील येथे आज दि.९/८/२०२० रविवार रोजी जि.परिषद शाळेमध्ये व संपूर्ण तालुक्यामधे अनेक ठीक ठिकाणी जागतिक आदिवासी दिन हा साध्या पद्धतीने साजरा करन्यात आला . जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात
सर्व प्रथम डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर, विर एकलव्य , बिरसा मुंडा , तंट्या भिल, ख्वाजा नाईक .यांच्या प्रतीमेला पुष्पहार वाहून पुजन करण्यात आले. दर वर्षी प्रमाने जागतिक आदिवासी दिन हा धुम धाम ने साजरा करन्यात येतो मात्र या वर्षी पुर्ण जगामधे कोरोना ने थैमान घातले असल्यामुळे जास्त गर्दि न जमवता सोशल डिस्टंशिन चे पालन करुन खुप साध्या पद्धतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करन्यात आला या वेळेस या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भील विकास परिषद चे महाराष्ट्र प्रदेश कार्यअध्यक्ष जब्बार तडवी , भष्टाचार निमूँलन समितीचे तालुका उपध्यक्ष गोकुळसिंग राजपूत,पत्रकार विनोद कोते,गायकवाड सर. संदिप सर , पोलीस पाटील विलास कुल्ली , शरीफ तडवी , युसुफ तडवी , भिमराव शेळके आदि उपस्थीत होते .
