योगेश गोसावी @ प्रतिनिधी नाशिक
आज शनिवार दि. ०८|०८|२० रोजी प्रभाग 31 मधील ज्ञानेश्वर नगर, पाथर्डी फाटा येथे छावा क्रंतिविर सेना व शंभू नारायण ग्रुपच्यावतीने रॅपीड एन्टीजन टेस्ट , ऑक्सीजन लेव्हल टेस्ट तपासणी करण्यात आली यावेळी होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप हे करण्यात आले सोशल डिस्टन्स व नियमांचे पालन करीत कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील बांधकाम विभागाचे उद्धव गांगुर्डे व शंभू नारायण ग्रुप चे मार्गदर्शक राजाभाऊ तेलंग व डॉक्टर गणेश पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन छावा क्रांतिवीर युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाभाऊ तेलंग व पूजा तेलंग यांनी केले .
प्रभागातील रहिवाशी यात सहभागी झाले होते करण्यात आलेल्या टेस्टमधून सात जण पॉझिटिव्ह मिळून आले त्यांना होम क्वारोंटाइन करण्यात येऊन औषध उपचार सुरू करण्यात आले आहेत .मिळालेल्या कीट मधून शंभर जणांची टेस्ट करण्यात आली तर उर्वरित राहिलेल्या नागरिकांची टेस्ट करण्यात येणार आहे. वाढत असलेल्या कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी दक्षता घेऊन सोशल डिस्टंसिंग मास्क लावणे व घराबाहेर जास्त न करण्याची खबरदारी घेत काळजी घेण्याचे राजेंद्र पाटील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले .परिसरातील रहिवाशांनी शिवा तेलंग यांच्या कार्याचे कौतुक करीत अशा प्रकारचे शिबिर आणखी आयोजित करून टेस्ट आणखी जास्त प्रमाणात करण्याची मागणी केली नोडल ऑफिसर डॉ छाया साळुंखे , मेडिकल ऑफिसर डॉ चारुदत्त जगताप, सुनिता सोनवणे यांनी टेस्ट करून घेत मार्गदर्शन केले सर्व डॉक्टर व सिस्टर यांचा सत्कार शिवा तेलंग व पूजा तेलंग यांनी केला
संदीप शेळके, राजाभाऊ खरात, वाल्मीक गरुड ,रितेश खरोटे, अक्षय भडांगे ,अक्षय पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
