महाराष्ट्राची जिवनवाहिनी .... लोकवाहीनी, गरीबरथ, असे अनेक नावाने महाराष्ट्रात सुपरिचित असणारी, लालपरी , 22 मार्च पासून, ते 5 ऑगष्ट पर्यंत म्हणजे 137 दिवस बंद होती, या बंद काळात (कोव्हिड19:) अनेकांना, म्हणजेच कर्मचारी वर्गांना, प्रवाशी बांधवांना अनेक चांगले वाईट अनुभव आले_ आणि यातुन सर्वजणांनी काहीना, काही आत्मसात केले, अशी लालपरी नसल्याने रस्ते सुनेसुनेसे झाले, ही लालपरी दि.6/8/2020 रोजी, येवला आगाराला खास महसुल मिळऊन देणाऱ्या येवला - नाशिक मार्गावर सकाळी ६, व दुपारी २.४५ वाजता सुरू होत आहे, यात जेष्ठ नागरीक, लहान मुले यांना प्रवेश नाही, कोणतीही सवलत नाही, अशी लालपरी, आपली रूतलेली चाके , काही अंशी हलण्यास तयार झाली आहे_ , यावेळी प्रवाशी, मित्रांनी तोंडास मास्क लाऊनच प्रवास करायचा आहे, येवला आगारातर्फ आपले सहर्ष स्वागत, अशीही लालपरी प्रवाश्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे आणि तीही, पर्जन्य राजाच्या साक्षिने, हिरवळीच्या सहवासात, लालपरी लाल शालु परीधान करून सज्ज आहे, तर चला, तर मग, कोव्हिड19 चे सर्व नियम पाळु_ आणि प्रवासाचा आस्वाद घेऊ, आणि चालक - वाहकास नियम पाळुन सहकार्य करा असे आवाहन
श्री. मधुकर ढाकणे ( येवला आगार ) नाशिक विभाग याचे कडून करण्यात आलेयेवलाची लालपरी निघाली नाशिक जिल्हा भेटीला
श्री. मधुकर ढाकणे ( येवला आगार ) नाशिक विभाग याचे कडून करण्यात आलेयेवलाची लालपरी निघाली नाशिक जिल्हा भेटीला

