प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव
औरंगाबाद - सदर ची घटना छ. शिवाजीनगर परिसरात एमरॉल्ड सिटीत या रहिवाशी भागात घडली विनायक पाटील कुटुंब समवेत कल्याण येथे नातेवाईक कडे गेले होते याच संधी चा फायदा घेत चोरटा घरफोडीच्या उद्देशाने गेला असता तेथे यथार्थ राजेंद्र जंजाळ हा मित्रा समवेत खेळत असताना अनोळखी इसम पाटील यांचे घरी काहीतरी करत आहे असे
लक्षात येताच मुलाने त्याच्या वडील राजेंद्र जंजाळ जे उपमहापौर आहेत त्यांना माहिती दिली. राजेंद्र जंजाळ यांनी तात्काळ पुंडलिक नगर पोलीस यांना माहिती दिली, पोलीस तात्काळ पोहंचले व चोरास पकडले आरोपी चे नाव शुभम प्रभाकर हिवाळे वय 23 रा. राजनगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद असून त्याच्या कडून चोरीची सकूटी हस्तगत केली असून आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
