Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हाथरस घटनेतील आरोपींना कोठोर कारवाई करा - चाळीसगाव शिवसेना महिला आघाडीचं तहसिलदारांना निवेदन

Responsive Ad Here

प्रतिनिधी

उत्तर प्रदेश येथील हाथरस घटनेतील  आरोपींना कठोरात कठोर कारवाई करा असे निवेदन चाळीसगाव महिला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज चाळीसगाव तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे देण्यात आले. उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील दलित परिवारातील 19 वर्षीय मुलीवर काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार केला ते गावगुंड फक्त बलात्कार करून शांत बसले नाही तर तिचे हाडेही तोडली गेली.  ती ह्यात नसली तरी मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या जबानीत सर्वकाही कथन केले आहे त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्या गाव गुंड प्रवृत्तीच्या युवकांना अटकही केली. असल्या गाव गुंड प्रवृत्तीच्या नराधमांना कायद्याने फास्टट्रॅक न्यायालयात दाखल करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी असे निवेदन चाळीसगाव महिला शिवसेनेच्या आघाडीच्या वतीने देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख 

रमेश चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाने, तालुका संघटक सुनील गायकवाड, जगदीश महाजन, संजय ठाकरे, शैलेंद्र सातपुते, अनिल राठोड, दिलीप पाटील, रामेश्वर चौधरी, सागर पाटील, बापू लेनेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सविता कुमावत, शुभांगी कुमावत, स्मिता सोनवणे, ज्योती गवळी, निर्मला मोरे, मनीषा महाजन, सोनाबाई कोळी, रंजना पाटील, मनीषा कोळी, नकुल बाई पाटील, मंगलबाई सूर्यवंशी, उषाबाई कोळी, उज्वला कोळी ललिता कावडे, शितल आहिरे, सुनीता साळुंके, ज्योती गवळी, सपना सोनवणे आदी शिवसैनिक, महिला कार्यकर्ता, पदाधिकारी उपस्थित होते.