Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बदल्ला लोणार शहराचा चहेरा नगर परिषद आरोग्य विभाग स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आघाडीवर शहराचे क्रार्य

Responsive Ad Here

लोणार दि. २४/१०/२०२० ( शेख.सज्जाद )

अधिकारी व पदाधिकारी यांचा योग्य सुसंवाद असला की कोणतेही अश्यक्य काम शक्य होत असते याचाच प्रत्यय लोणार शहरवासी घेत आहे. एकीकडे शहरातील साफसफाई व स्वच्छतेबाबत लोणार नगर परिषद आरोग्य विभाग हा पिच्छाडीवर होता मात्र अधिकारी, पदाधिकारी यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे लोणार शहराचे रूपडे पालटल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

      लोणार नगर परिषद आरोग्य विभागाचा कारभार आरोग्य निरीक्षक अशोक निचंग यांनी १ सप्टेंबर २०२० रोजी स्वीकारला त्यांनी आरोग्य विभागाची दयनीय अवस्था पाहून शहर स्वच्छते अगोदर नगर परिषद आरोग्य विभाग स्वच्छ व सुंदर करत आधी केले मंग सांगीतले या म्हणी  प्रमाणे आरोग्य निरीक्षक अशोक निचंग यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, नगर परिषद  अध्यक्षा पुनम मनीष पाटोळे, उपाध्यक्ष नूरमहंमद खान बादशाह खान पठाण, आरोग्य सभापती फरजाना बी शे. रऊफ, काँग्रेस गटनेते भुषण मापारी, शिवसेना गटनेते प्रा. बळीराम मापारी, राजेश मापारी,नगर सेवक  पाणीपुरोठा सभापति आबेद खान,  गुलाब सरदार, प्रा. गजानन खरात,सतीश राठोड, संतोष मापारी, तोफीक कुरेशी,अनिल मापारी, कंकाळ सर, संतोष मापारी, गजाननं जाधव सर, सह सर्व नगर सेवक, नगर सेविका यांना आपली स्वच्छतेविषयी भूमिका मांडत सर्वांना विश्वासात घेत सबका साथ सबका विकास या म्हणी प्रमाणे सर्वांना सहकार्य करीत लोणार शहर स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत शहराला नावलौकिक मिळवुन देण्यासाठी एकत्र काम करण्याचे तसेच  काही मार्गदर्शक सूचना करण्याचे सांगितले. त्याचाच परिपाक म्हणून सध्या शहरात सर्वत्र स्वच्छतेचे वातावरण दिसू लागले आहे. शहर स्वच्छतेसाठी नगर परिषदेच्या ७ घंटा गाड्या ह्या घरोघरी जावून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत करीत आहे. त्याच बरोबर दुकाने - प्रतिष्ठाने या करीता दुपारी ते सायंकाळी २ घंटा गाड्या कार्यरत आहे. नालीमधील साफसफाई साठी एक ट्रॅक्टर कार्यरत आहे. शहरातील नाल्यामध्ये बीएसी पावडर तसेच मलेरीया ऑइल ची दोन वेळा फवारणी करण्यात येऊन शहर डासमुक्त करण्यात आले असून स्वच्छतेसाठी सोशल मीडिया चा वापर करत व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले असून कोणाची स्वच्छता विषयी काही तक्रार असल्यास व्हाट्सअप ग्रुपवर टाकण्याबाबत सूचना देऊन आलेल्या तक्रारींचे तात्काळ स्वच्छता करून निपटारा केल्या जात आहे. आता येणाऱ्या काळात आठवडी बाजार व मापारी वेटाळ येथील शौचालय नागरीकांच्या सेवेत सुरू करण्यात येणार असून या लोणार शहर स्वच्छतेसाठी आरोग्य निरीक्षक अशोक निचंग यांच्या सोबत त्यांचे सहकारी शे. सलीम, चेतन बाजड, शुभम मोरे, शे.अनामत शे. करामत, शे. तौफिक शे. अजीज, शे. वाजेद शे. महेबुब, कैलास मादनकर, मंगेश मापारी, संतोष डोळे, गोपाल डागर, विजय नरवाडे, सुनील इरतकर, संतोष डागर, तेजराव पाटोळे, गणेश लांडगे, नितीश घाटोळे,सागर डागर, विनोद बाजड, नरेंद्र खरारे, हे स्वच्छतादुत अथक मेहनत घेत असून सर्वांच्या सहकार्याने शहराचा चेहरा मोहरा बदलला असून घाणीचे लोणार आता स्वच्छ , सुंदर लोणार दिसत असुन शहराचे रूपडे पलटल्याचे चित्र असुन लोणार शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी शहरातील  नागरीकांचे मौलाचे सहकार्य मोठ्या प्रमाणात आहे.