देवानंद नेमाने @ प्रतिनिधी नांदुरा
मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार,संघर्षयोध्दा मा.श्री.राजेशजी एकडे यांनी आज तालुका क्रीडा संकुल ची पाहणी करून तालुका क्रिडा संकुल समिती मलकापूर ची बैठक घेतली व तालुका क्रीडा संकुला चा आढावा घेतला. तालुका क्रीडा संकुलाच्या कामकाजा मध्ये व तालुका क्रीडा संकुलाच्या परिसरामध्ये आणखी सुधारणा तसेच नवीन नवीन तालुका क्रीडा संकुल समिती मधील अशासकीय सदस्यांची तात्काळ नियुक्ती करावी अश्या सूचना केल्या.सदर बैठकीला मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.राजू पाटील,मलकापूर विधान सभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष श्री.बंटी पाटील,मालकपूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.संभाजी शिर्के,सोशल मीडियाचे श्री. समाधान इंगळे सर,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.संजय सबनीस,तालुका क्रीडा अधिकारी श्री.इंगळे,क्रीडा मार्गदर्शक राजू भोसले,श्री.चंद्रकांत साळुंके,स्वप्नील साळुंके प्रामुख्याने उपस्थित होते.

