देवानंद नेमाने@प्रतिनिधी नांदुरा
विदर्भ कोपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. यांच्या वतीने नांदुरा अग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. नांदुरा यांच्या माध्यमातुन कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा येथे मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते आज शासकीय हमीभाव दराने सोयाबीन,उडीद व मूग खरेदीचा शुभारंभ झाला. शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव दराने सोयाबीन,उडीद व मूग खरेदी चा लाभ घ्यावा असे आव्हान आमदार मा.श्री.राजेश एकडे यांनी केले.या शासकीय हमीभाव दराने सोयाबीन,उडीद व मूग खरेदीच्या शुभरंभाच्या कार्यक्रमास नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भागावांभाऊ धांडे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख व जि.प.सदस्य श्री.वसंतराव भोजने,राष्ट्रवादी काँगेस चे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहनराव पाटील,विदर्भ कोपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व्यवस्थापक श्री.संदीपजी पेटकर,सहाय्यक निबधक श्री.महेश कृपलानी,केंद्र प्रमुख श्री. संजय नाशिककर,नांदुरा अग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.नांदुरा अग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.श्री.अमोल पाटील,शेतकरी सर्वश्री रामदास मांटे, गजानन शेळके व तालुक्यातही शेतकरी,नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

