गणेश महाजन@ एरंडोल तालुका प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे यांनी त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्या ची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार विजयादशमी अर्थात दसरा या सणाच्या मुहूर्तावर पुणे येथील नामांकित ग्रीन फौंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष अमित जगताप तसेच साधना सहकारी बॅंक मा.व्हा.चेअरमन मा.श्री.बाळासाहेब कोळपे यांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .पुरस्कार मिळाल्याने मौलाना आझाद विचार मंच चे प्रदेश अध्यक्ष मा , खासदार हुसेन दलवाई उप प्रदेशाध्यक्ष जळगावचे माजी उपमहापौर अब्दुल करीम सालार भारतीय पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांची जिल्ह्यातील सर्व टीम, न्यूज टाईम चे संपादक फारुक शहा नोमानी उपसंपादक जावेद सर त्यांची सर्व टीम ,प्रजा न्यूज महाराष्ट्र चे संपादक प्रतिक जाधव व त्यांची सर्व टीम ,पत्रकार मित्र ,राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

