Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हाथरस घटनेचा शिवसेनेच्या वतीने चान्नी येथे तिव्र निषेध

Responsive Ad Here

योगेश नागोलकार ता.प्रतिनिधी:पातूर

राहेर:हाथरस घटनेचा निषेधार्थ शिवसेनेने उतर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदीत्यनाथ यांचा पुतळा श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक चान्नी येथे जाळून निषेध व्यक्त केली आहे.येथील हाथरस जिल्ह्यातील चंदपा परिसरातील एका गावात १९ वर्षीय मनिषा वाल्मिकी पीडितेवर १४ सप्टेंबर रोजी चार नराधमांनी सामृहिक अत्याचार केला तसेच तिच्यावर अनन्वित अत्याचार केले.या संदर्भात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना त्वरीत  फाशीची शिक्षा व्हावी या साठी आमदार नितिन देशमुख,यांच्या मार्गदर्शनाखाली   शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र मुर्तडकर यांच्या नेतृत्वात आलेगाव,पातूर,येथे सुद्धा तिव्र निषेध केला आहे.शिवसेनेने चान्नी येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौकात ५ आँक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तिव्र 

निषेध व्यक्त केला. तिच्यावर दिल्ली  येथील सफरदगंज रुग्णालयात उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मावळली या किळसवाणी घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.यातील चारही आरोपींना अटक करण्यात आली असून त्या नराधमांना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शिवसेना कार्यकत्यांनी यावेळी केली आहे.या आंदोलनात शिवसैनिकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या विरोधात चान्नी येथे जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य संदीप तुकाराम सरदार,जि.प.सदस्या लताताई पंजाबराव पवार,शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश्रीताई अशोक बोराडे,पं.समीती सदस्य एडवोकेट सुरज झडपे,पं.समीती सदस्य अनिल रामराव इंगळे,पं.समीती सदस्य गोपाल ढोरे,पं.समीती सर्कल प्रमुख शांताराम पाटील,पिपंळखुटा शिवसेना सर्कल प्रमुख संतोष पाटील,तसेच शिवसेना पदाधिकारी पंजाबराव पवार,नारायण भिसे,दिपक जावळे,अमोल काळे,किरण काळे,निवृत्ती बनीये,संरपंच बनिये गुलाबराव मांजरे,वंसता महाराज लखाडे,नंदकुमार डाखोंरे,निवृत्ती पाटील,समीर भाई,राजू काळे,देवानंद काळे,दिपक ताले,पंकज पवार,अशोक बोराडे,राजू भगत,प्रशांत बंड बंडू राखोंडे,राहुल देशमुख, तसेच शिवसेना महीला पदाधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी आजी माझी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामराव राठोड,यांच्या पथकासह यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.