Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दिव्यांग वृध्द निराधार यांच्या झोपा काढो आंदोलनाची दखल-तहसिलदार बिलोली

Responsive Ad Here

 तहसिलदार बिलोली यांनी दिव्यांग वृध्द निराधार यांच्या झोपा काढो आंदोलनाची  दखल घेऊन सहा प्रश्नांचे लेखी दिल्यामुळे बिलोली येथील झोपा काढो आंदोलन  मागे  चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर दिव्यांग,वृध्द,निराधार यांच्या सहा प्रमुख मागण्या मा तहसिलदार साहेब बिलोली यांनी पंधरा दिवसांत न सोडविले तर त्यांच्या दालनात झोपा काढो आंदोलन दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा इशारा बिलोली तालुक्यातील शिष्टमंडाळानी  निवेदनाद्वारे दिला असता कर्तव्यदक्ष बिलोली तहसिलदार  साहेब सहा मांगन्याचे लेखी उतर देऊन झोपा काढो आंदोलन स्थगित करून प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केल्यामुळे बिलोली येथील झोपा काढो आंदोलन स्थगित करण्यात आले. 

       केलेल्या मागन्या मिळालेले उतर खालील प्रमाणे 

       1) दिव्यांग वृध्द निराधार यांना केंद्र सरकारने  दरमहा मिळणारे अनुदान तिन महिने दुप्पट एकरकमी खात्यात देण्याचे आदेश देऊन ते तर मिळालेच नाहि पण नेहमी मिळणारे अनुदान चार महिन्या पासून मिळत नाहि. 

      मिळालेले उतर जुलै ते आँगस्ट तिन महिन्याचे बिले मंजुर केले असून  चार दिवसात जमा करण्यात येईल. 

  २) जागतिक संकटकाळी दिव्यांग वृध्द निराधार यांना  अंत्योदय योजनेत समाविष्टकरून  त्यांना लाभ देण्याचे लेखि आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी का? केली जात नाहि ?

 मिळालेले उतर अंत्योदय योजनेत बिलोली तालुक्यात 4567  कार्डाचे दिलेले इंष्टांक मंजुर केलेले आहे.शासनाकडुन वाढिव इंष्टांक दिलेला नाही वाढीव मंजुरी आल्यानंतर दिव्यांगाना अंत्योदय योजनेत लाभ दिला जाईल. 

 ३)  अशा संकटकाळी भुकमारी होऊ नये म्हणून धान्य किट पुरवठा करण्याचे आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी केली जात नाहि 

      उतर नाहि

   ४) संजय गांधी, ईतर योजनेत पाञ लाभार्थी निवड आठ ते दहा महिने  होत नाहि  निवड झालेल्या पाञ लाभार्थ्यांना मंजुरीनंतर सहा महिने अनुदान मिळत नाहि व नामंजूर किव्वा मंजुर झालेले कळविण्यात येत नाही. 

  मिळालेले उतर संजय गांधी निराधार कमिटी अस्तित्वात नाही मा.जिल्हाअधिकारी साहेब यांच्याआदेशाननुसार दरमहा मिटिंग मध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात येतात .मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना तलाठी यांच्या मार्फत गावात चावडी वाचन केली जाते व खात्यात रक्कम जमा केले जाते. 

       ५) संजय गांधी निराधार योजनेच्या कमिटीत दिव्यांग बांधवांना  सदस्य यांची निवड शासन आदेश असुन त्यांची अंमलबजावणी केली जात नाहि .

  मिळालेले उतर संजय गांधी निराधार कमिटी अस्तित्वात नसुन कमिटीत पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार मा जिल्हाधिकारी साहेब निवड केली जाते.  तरी आपल्या निवेदनानुसार वेळोवेळी बिलोली तहसिल कार्यालयाकडून दिव्यांग बांधवांचे कामे केली जात आहेत .तरी काही कामे प्रलंबित असतील तर निर्देशनास आणुन द्यावी त्वरीत निर्णय घेतला जाईल.  तरी आपले झोपा काढो आंदोलन स्थगित करून प्रशासन यास सहकार्य करावे. 

        अशाप्रकारे लेखि पञ दिल्यामुळे अनुदान खात्यात जमा केल्यामुळे बिलोली तहसिल दारातील झोपा काढो आंदोलन स्थगित करण्यात आले असे प्रसिद्ध पञक दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर बिलोली तालुका अध्यक्ष रामलू मोगरेवार बालाजी होनपारखे संतोष नरवाडे, श्रीरामे राजु, शंकर म्हेञे,राजेंद्र शेळके,गंदेवाड  इत्यादी ने प्रसिद्ध दिली.