काशिनाथ शिंदे @तालुका प्रतिनिधी जामनेर
जामनेर येथे दिनांक 13 ऑक्टोंबर वार मंगळवार ०३ वाजता बीओटी कॉम्प्लेक्स वरती ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व नर्सिंग कॉलेज चे उद्घाटन माननीय श्री देवेंद्रजी फडवणीस( विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश भाऊ महाजन आमदार जामनेर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त ग्लोबल महाराष्ट्र मल्टीपर्पज हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे. 13 तारखेला माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस
यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण झाले जामनेर मधील या भव्य सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी सर्व सेवासुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत .शासकीय योजना देखील या ठिकाणी सर्व गरीब आणि गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत .त्यांची माहिती देण्यासाठी या रुग्णालयात स्वतंत्र कक्ष देखील उभारण्यात आले आहे.
जळगावच्या रुग्णांनी नाशिक .पुणे .मुंबई .कुठेही उपचारासाठी जाण्याची गरज नाही. सवलतीच्या दरात रुग्णांना या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार मिळतील अशी माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे लिव्हर. किडनी. ट्रान्सफर हॉट सर्जरी. वगळता सर्व उपचार या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे असे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले माननीय श्री देवेंद्र फडवणीस (माजी मुख्यमंत्री) यांनी सांगितले उत्कृष्ट दर्जाचे मशिनरी या हॉस्पिटल ला उपलब्ध आहे व माजी मंत्री गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांनी या हॉस्पिटल साठी खूप मेहनत घेतली आहे त्यांचे अभिनंदन केले व त्यांचा गौरव करत देवेंद्र फडणीस यांनी गिरीश महाजन यांना पुन्हा सदिच्छा दिल्या .या ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उद्घाटन सोहळ्यात उपस्थित खासदार उमेश दादा पाटील. खासदार रक्षा खडसे .माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील .जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील. आमदार राजूमामा भोळे. आमदार किशोर आप्पा पाटील .आमदार संजय सावकारे. आमदार मंगेश चव्हाण. महापौर भारती सोनवणे. माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे. आमदार चंदुभाई पटेल. माजी आमदार गुरुमुख जगवाणी. माजी आमदार स्मिता वाघ .जामनेर नगराध्यक्ष साधनाताई महाजन. व जी एम हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर महेंद्र चव्हाण उपस्थित होते यावेळी जामनेर नगर परिषदेकडून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचा सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे कोरोणा काळातील सेवेबद्दल लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे व अरविंद देशमुख यांचा सत्कार माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र .फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आला शेवटी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी गिरीश महाजन माजी मंत्री यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी यांची उपस्थिती होती.व अनेक बीजेपी पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमात हजर होते.

