योगेश नागोलकार तालुका प्रतिनिधी पातूर
राहेर: आलेगाव आलेगाव गावामध्ये ब्रेक नंतर 7 ऑक्टोंबर रोजी बुधवारी एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गावातील कोरूना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 30झाली आहे. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. एक जण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे.
आलेगाव ग्रामपंचायत स्थानिक प्रशासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष असून गावांमध्ये कोणत्याच प्रकारची खबरदारी घेण्यात येत नसून सोमवारच्या दिवशी आठवडी बाजार पेक्षा जास्त गर्दी दिसून येत आहे. बाजारात विक्रेता व विक्रेत्या ग्राहक मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे.फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिंती व्यक्त होत आहे.