Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सध्या निर्धास्तपणे सुरु असलेल्या गैरप्रकाराकडे जळगाव सार्वजनिक बांधकाम दुर्लक्ष

Responsive Ad Here

जामनेर  प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील जामनेर ते देऊळगाव दोनपदरी रस्ता बांधकाम संथगतीने सुरु आहे.बांधकाम ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे काम करीत असल्याचे चित्र दिसून येत असून नागरीक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.शहापुर गावाजवळ सुरु असलेले सिमेंट रस्त्याचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे होत असून त्याबाबत येथील रहिवासी स्थानिक नागरिकांनी बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार केली आहे.

    शहापुर येथे रस्ता ब्लाँक टाकतांना सिमेंट तसेच लोखंडी सळ्या कमी मी.मी.आकाराच्या टाकल्या जात आहे. तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी शहापूर येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता नित्कृष्ट दर्जाचे काम आढळून आले.तपासणी नंतर तात्काळ सुरू असलेले बांधकाम थांबविण्यात आले होते, मात्र अधिकारी गेल्यानंतर पुनश्च ज्या-त्या नित्कृष्ट दर्जाचे काम अद्यापही सुरुच आहे.ठेकेदाराकडे शासकीय बांधकाम करण्यासाठीचा परवाना अथवा तंत्रज्ञ अनुभवही नसल्याने हे बांधकाम करण्याचे काम शासनाने कोणत्या अटीवर दिले? असा सवाल तक्रारदार यांनी केलल्या अर्जात केलेला आहे. तसेच या विषयीची शासकीय स्तरावरुन संपूर्ण चौकशी करुन होत असलेला गैरप्रकार त्वरीत थांबविण्यात यावा , ही मागणी केली आहे. शासनाच्या बांधकाम विभागाकडे याबाबत सविस्तर दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे.सध्या सुरु असलेल्या रस्ता बांधकाम चौकशी करुन काम थांबविण्यात यावे, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुनिल बाबुराव ठाकूर, अनिल रामकृष्ण सूर्यवंशी विकास जनार्दन पाटील,लवकेश बाबुराव कोळी,आणि शांताराम मोहनलाल जैस्वाल आदींनी दिलेल्या तक्रारीत म्हटलेले आहे.