Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पाचोऱ्यात गावठी कट्ट्यासह ५ जिवंत काडतुसे, ७ मोबाईल इंडिका गाडी सह ५ लाख ४५ हजाराच्या ऐवजा सह ५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Responsive Ad Here

पाचोरा  प्रतिनिधी

  पाचोरा येथे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत गावठी कट्ट्यासह ५ जिवंत काडतुसे, ७ मोबाईल, इंडिगो गाडी अशा ५ लाख ४५ हजाराच्या ऐवजा सह ५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. आरोपीं विरुद्ध गु.र.नं. ३४४ /२०२० भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

      याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांचे पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. ४ रोजी सकाळी ८ वाजता पाचोरा शहराला जोडणारा जळगांव चौफुली ते जामनेर रोडवर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल नाईक, पो. हे. काॅ. विलास पाटील, दत्तु बडगुजर, पोलिस नाईक विजय पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, सोपान पाटील, गनी तडवी, श्रीकांत ब्राम्हणे, पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी राहुल बेहरे, किरण पाटील या पथकाने सापळा रचुन शिताफीने इंडिगो कार अडवुन वाहन चालक सागर निवृत्ती गांगुर्डे (वय - २९) रा. शिरुर, ता. चांदवड जि. नाशिक - कार चालक,  सागर आवण वांजोळे (वय - २३) रा. शिरुड, ता. चांदवड, जि. नाशिक, अमोल रमेश बुल्हे (वय - २५) रा. शिरसगाव लौकी, ता. येवला जि. नाशिक, राहुल विठ्ठल कराळे (वय - २५) रा. शिरेगाव ता. गंगापुर, जि. औरंगाबाद, देवचंद बाळासाहेब जगताप (वय - २४) रा. मरळगोई ता. निफाड जि.नाशिक यांना ताब्यात घेतले. सदर आरोपींकडे गावठी कट्ट्यासह ५ जिवंत काडतुसे, ७ मोबाईल, इंडिगो गाडी असा सुमारे ५ लाख ४५ हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे.आरोपताचे ताब्यात मिळुन १० हजार रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे लोखंडी धातुचे काळी पिस्टल ग्रीप असलेले मॅगझीन असलेले आरोपी सागर निवृत्ती गांगुर्डे याच्या कब्जात मिळुन आलेले

३ हजार ५०० रुपये किंमतीचे ७ नग पिस्टलचे जिवंत काडतुस,५ लाख रुपये किंमतीची एम. एच. २७ ए. सी. २५५७ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची टाटा इंडीगो सी. एस. कार, १० हजार रुपये किंमतीचे दोन ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन, १० हजार रुपये किंमतीचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, १ हजार ५०० रुपयांचा एक नोकीया कंपनीचा मोबाईल फोन असा सुमारे ५ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींकडुन हस्तगत केला आहे. सदर कारवाई ने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेसह पाचोरा पोलिस स्टेशनचे  पोलिस काॅन्स्टेबल यशवंत घोरसे हे करीत आहे.