गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल शहरातील आठवडे बाजार हा कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी शहरवासीयांनी तसेच आठवडे बाजारावर अवलंबून असलेल्या छोट्या मोठ्या व्यावयसायिकांनी देखील काटेकोरपणे केली आहे.परंतू शहरातील बहुसंख्य छोटे व्यावसायिकांचा उदरनिर्वाह हा आठवडे बाजारावर अवलंबून आहे आणि बऱ्याच दिवसांपासून बाजार बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
तसेच तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना देखील आपला शेतमाल विकण्यासाठी आठवडे बाजार हे उत्तम साधन आहे. तरी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव हा पूर्वीपेक्षा काही प्रमाणात कमी झालेला असून सोशल डिस्टंसिंग चे नियम बंधनकारक करून आठवडे बाजाराला परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन नगरसेविका आरती महाजन व युवासेना शहरप्रमुख अतुल महाजन यांनी एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांना दिले यावेळी मुख्याधिकारी देशमुख यांनी मा.प्रांताधिकारी साहेबांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले.
