Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अत्याधुनिक सुविधा मिळणार आता जामनेरात

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

 माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने जामनेर शहरात राष्ट्रीय दर्जाचे ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यात आले असून याचे १३ ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. हे हॉस्पिटल जिल्ह्याच्या आरोग्य विकासात महत्वाचा टप्पा ठरणार आहे. जामनेर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त ग्लोबल महाराष्ट्र मल्टीपर्पज हॉस्पिटल रूग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे. येत्या १३ तारखेला माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण केले जाणार आहे.

                जामनेर मधील या अति भव्य सुसज्ज अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी सर्व सेवासुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शासकीय योजना देखील या ठिकाणी सर्व गरीब आणि गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी या रुग्णालयात स्वतंत्र कक्ष देखील उभारण्यात आला आहे. जळगावच्या रुग्णांनी नाशिक, पुणे, मुंबई, सुरत कुठेही उपचारासाठी जाण्याची गरज नाही, सवलतीच्या दरात रुग्णांना या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार मिळतील अशी माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.