Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मलकापूर येथे डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी न्याय देण्याबाबत जिल्हा नेते अतिशभाई खराटे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन

Responsive Ad Here

 किरण वाघ जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा

 डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कोर्टात त्वरित पुनर्विचार याचिका दाखल करून रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या अधिष्ठाता आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या वर कारवाई करावी याबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुलडाणा जिल्हा नेते अतिशभाई खराटे यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मार्फत देण्यात आले

          सुप्रीम कोर्टाने दि. 8/10/2020 रोजी डॉ. पायल तडवी आत्महत्या केसमधिल आरोपींना नायर मेडिकल कॉलेज मधे पुढील शिक्षणासाठी अनुमती देणारा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात जो निकाल दिला आहे तो पहाता पायलला न्याय मिळवून देण्याच्या कामी महाराष्ट्र सरकार अपयशी  ठरले आहे. मानवी हक्क आणि अधिकार यांचा विचार करता डॉक्टर पायल तडवी ला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे

1) महाराष्ट्र सरकारने या केसमध्ये डॉक्टर पायल तडवी ला न्याय मिळवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

2) महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यानुसार डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना दोषी ठरवून त्यांना निलंबित करण्याची रांगिंग विरोधी समितीची शिफारस असतानाही महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कायद्याच्या चौकटीत बसणारे आदेश काढले नाहीत त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे आरोपींनी रांगिंग केल्याचे सिद्ध झालेले असूनही प्रतिबंधक कायदा लागू होत नाही सबब अधिष्ठाता आणि कुलगुरू या दोघांवरही कारवाई करण्यात यावी.

3) डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींचे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ने वैद्यकीय व्यवसायाचे लायसन्स रद्द करावे.

4) उच्च शिक्षण घेत असताना जातीयवादी मानसिकतेतून दलित आदिवासी इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा जो छळ केला जातो त्यावर प्रतिबंध आणणारा कायदा असावा.

5) डॉक्टर पायल तडवी ला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ आणि निष्णात वकिलांची नियुक्ती करून विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे

     सदर निवेदनावर जी.उपाध्यक्ष भाऊराव उमाळे,ता.उपाध्यक्ष गजानन झनके, विलासभाऊ तायडे,जगणभाई गवई,रविंद्र मोरे,विनोद वानखेडे,विष्णू इंगळे, पी.डी.पवार,श्रीरंग तायडे, व्ही.सी.मोरे,श्रावण झनके,सतीश नरवाडे,रविराज खराटे,रमेश तायडे,इलियास खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.