प्रतिनिधी
शालेय विद्यार्थी वाहतुक. स्कूल व्हॅन. ऑटोरिक्षा चालक मालक यांचे आर टी ओ टॅक्स. पासिंग. इंशुरन्स. व सर्व बॅक त्यावरील व्याज माफ करावे तसेच इतर विविध मागण्या सोडविण्यात याव्या भगवे वादळ महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटना च्या वतीने प्रदेश अध्यक्ष मा. अतुलजी खोंड. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हादराव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा. स्कूल व्हॅन . विद्यार्थी वाहतुक चालक मालक यांना आर्थिक मदती सह विविध प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची जामनेर येथे भेट घेऊन निवेदन देण्यात आले
निवेदन देतांना
जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष प्रमोद वाणी. सरचिटणीस भरत वाघ, उपाध्यक्ष विनोद कुमावत सल्लागार राजेंद्र माळी. अमरावती अध्यक्ष रविभाऊ उपाध्यक्ष प्रकाश गडलिंग . पंचगाय. अकोला अध्यक्ष प्रमोद दांदळे रणजित शेटे. प्रफुल्ल कठांळकर विजय अहिरराव . ज्ञानेश्वर शिवदे. सुनील वाणी. यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शासनाकडे मागण्यां संदर्भात पाठपुरावा केला जाईल असा विश्वास दिला. लॉकडाउन घोषित झाल्यापासून अहोरात्र प्रवासी व विद्यार्थी वाहतूक सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच ऑटोरिक्षा. स्कूल व्हॅन. विद्यार्थी वाहतुक व्यवसाय बंद असल्याने त्याच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे . जिवन जगायचे कसे दैनंदिन सह इतर खर्च कसा करायचा आर टी ओ. बॅक, फायनान्स कंपनी चे हप्ते कसे भरायचे याची चिंता आहे यासाठी केंद्र व राज्य शासनाने आर्थिक मदत द्यावी व आर टी ओ टॅक्स. पासिंग. इंशुरन्स. व सर्व बॅक, फायनान्स कंपनी चे हप्ते भरण्यासाठी एक वर्षाकरिता मुदत वाढ मिळावी व त्यावरील व्याज माफ करावे तसेच इतर विविध मागण्या विधानसभा सभेत मांडावे आम्हाला न्याय मिळवून द्यावा याचीही लेखी निवेदन देण्यात आले यावेळी माजी मंत्री आ. गिरीषभाऊ महाजन केंद्रीय मंत्री डॉ . सुभाष भामरे. खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षाताई खडसे. आमदार राजु मामा भोळे. आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे. महापौर भारती ताई सोनवणे, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी. यांच्या उपस्थितीत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
