प्रतिनिधी/अकोला
शहरातील स्थानिक सम्यक संम्बोधी सभागृहात युवा स्वाभिमान पक्ष अकोला युवक जिल्हाध्यक्ष सागर खंडारे यांनी ६४ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी युवा स्वाभिमान पक्ष युवक आघाडी अकोला जिल्हा कार्यकारिणी रक्तदान करुन घोषित केली. यावेळी ३३ रक्तदात्यांनी रक्तदान करुन महापुरुषांनी आदरांजली वाहिली. जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रदीप इंगळे, जिल्हा कोषाध्यक्ष धनराज बागळे, जिल्हा महासचिव आकाश जंजाळ, जिल्हा संघटक शरद तिवारी, जिल्हा सचिव नितीन ढगे, सचिन जंजाळ अकोला पुर्व तालुका अध्यक्ष शुभम इंगळे तर पश्चिम तालुका अध्यक्ष सचिन जंजाळ यांची निवड संस्थापक आ.रवि
राणा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सागर खंडारे यांनी सदर नियुक्ती केली. यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे मेहकर तालुकाध्यक्ष मैफुजा परवीन सैय्यद, विदर्भ सचिव निखिल चौधरी, बुलढाणा जिल्हा संघटक सैय्यद अली, शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष मसावे, विशाल वाघ,भुषण खंडारे,वैभव लांडे, गणेश चिकटे, अक्षय सपकाळ, वैभव वक्कर, अमर ढोकणे, प्रतिक थुंकेकर, पंकज कांबळे, प्रतिक शिरसाठ, अजय अंभोरे, विशाल इंगोले, सौरभ डोंगरे, विनोद सरदार, सुशिल तेलगोटे, अक्षय सदांशिव, गोपाल पाटिल, अमित गजभिये, नितिन लांडे यांच्यासह युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
