Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वृक्ष लागवडीला लोकचळवळीचे रूप द्या - आ. सुलभाताई खोडके यांचे आवाहन

Responsive Ad Here

शहर सौंदर्यीकरण व वृक्षलागवडीबाबत घेतला आढावा  

अमरावती १५ ऑक्टोबर : शहर सौंदर्यीकरणाबरोबरच विकासकामांची गतीने पुर्तता करण्यासह वृक्षलागवडीचे महत्व, पर्यावरणाचे रक्षण आणि जागतीक तापमानात होणारी तिव्रता कमी करणे अर्थात मिटीगेशन ऑफ ग्लोबल वार्मींग इत्यादी संदर्भातील महत्व लक्षात घेता अमरावतीच्या आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सुंदर व हरित अमरावतीचा निर्धार केला आहे . त्यानुषंगाने आ. सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेत शासकीय विश्रामगृह येथे बुधवार दि. 14 ऑक्टोंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती महानगर पालीकेचा उद्यान विभाग तथा  अमरावती गार्डन क्लब  यांचे पदाधिकारी समवेत अमरावती शहरातील विकसीत करण्यात आलेल्या रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये तथा दुतर्फा  वृक्ष लागवडीकरीता संयुक्तीक आढावा बैठक संपन्न झाली. अमरावती गार्डन क्लबने अमरावती शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अत्यंत नियोजनबध्द आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्तावीत केला आहे. तसेच शहरी क्षेत्रातील प्रत्येक रस्त्याची पाहणी केल्यानंतर सद्यस्थितीबाबत व त्यानंतर त्यामधील आवश्यक सुधारणा करण्याबाबत समितीचे अध्यक्ष तथा सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. थोटांगे यांना केलेल्या सुचनांबाबत या बैठकीदरम्यान आढावा घेण्यात आला.  या सोबतच गार्डनक्लबच्या  वतीने प्रत्येक रस्त्यावर हरीतसृष्टी साकारण्याला घेवुन मार्गदर्शक सदस्यांची नेमणुकीसंदर्भात मुद्दा चर्चेला आला असतांना यावर आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सहमती दर्शवीली. या बैठकीत गार्डन क्लब ची भूमिका  स्पष्ट करतांना   डॅा. दिनेश खेडकर यांनी  सांगितले की , शहरातील विविध रस्ता बांधकामावर  कार्यरत अभियंते हे मार्गदर्शक सदस्यांसोबत समन्वय साधतील. यासाठी सहकार्य म्हणून गार्डन क्लबच्या वतीने अमरावती शहरातील क्षेत्रनिहाय क्लबच्या ज्येष्ठ आणि तज्झ व्यक्तींची पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक ठिकाणी आता निर्देशानुसार कार्य होण्यासाठी तसेच वेळोवेळी अत्यावश्यक सुधारणा सुचविण्यासाठी सातत्याने क्लबद्वारे लक्षपुर्वक निरिक्षण सुध्दा नोंदविल्या जाणार आहे. असेही डॉ . खेडकर यांनी सांगितले . दरम्यान  आमदार महोदयांचे दिशानिर्देशानुसार तसेच गार्डन क्लबने सुचविलेल्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याला घेवुन बैठकीमध्ये अनुकुलता दर्शवीत सार्वजनीक बांधकाम विभागाच्या वतीने कार्य़वाही करण्यात येत आहे.अशी माहिती समितीचे प्रमुख एस . पी . थोटांगे यांनी दिली .  या बैठकी दरम्यान आगामी 31 ऑक्टोंबर पर्यंत सॅम्पल पॅचेस करुन दाखविण्याबाबत आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सबंधितांना निर्देशीत सुध्दा केले. तसेच इर्वीन चौक परीसर येथील सौंदर्यीकरण आणि चित्रा चौक स्थित महात्मा ज्योतीबा फुले पुतळा परीसर येथील सौंदर्यीकरण व सुशोभीकरणाची कामे लवकरात लवकर करण्यात यावी. तसेच जयस्तंभ चौक स्थित महात्मा गांधी पुतळा परिसर  यासह शहरातील इतरही ठिकाणच्या थोरमहापुरुषांच्या पुतळा परिसराचे सौदरीकरणाच्या सूचना देखील  आमदार महोदयांचे वतीने सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिका-यांना बैठकीत  देण्यात आल्या .  रस्ते व दुभाजकांची कामे शिघ्रतेने पूर्ण झाल्यानंतर शहर सौंदर्यीकरणाकरीता रस्त्यांच्या कडेला व दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांची निगा राखावी व या वृक्ष संवर्धनाच्या राष्ट्रव्यापी अभियानाला सहकार्य करीत या कार्यामध्ये नागरीकांनी सहभाग नोंदवावा. यासोबतच जनसामान्यांच्या वतीने करण्यात आलेल्या सुचनांचे स्वागत करण्यासह त्यांचा आदर राखीत वेळोवेळी योग्य दखल सुध्दा घेतल्या जाईल अशी भुमिका आ. सौ. सुलभाताई खोडके यांचे वतीने  यावेळी व्यक्त करण्यात आली. लोकसहभागातुनच सर्वोत्तम विकास होऊ शकतो. तेव्हा प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवीत वृक्षसंवर्धन व संरक्षणार्थ पुढे यावे. असे त्यांनी आवाहन सुध्दा केले. अमरावतीत हरित सृष्टी साकारण्यासाठी  स्थानीय नागरीकांसह विभागाच्या यंत्रणेबरोबरच व शासकीय तथा खाजगी महाविद्यालय, अशासकीय संस्था, खाजगी उद्योजक, सामाजिक दायित्व सहकारी संस्था, विविध सामाजीक उपक्रमात अग्रेसर असणारी मंडळे व संस्था, त्यांना पण या उपक्रमात कसे सहभागी करुन घेता येईल. या विषयाला अनुसरुन सुध्दा यावेळी चर्चा करण्यासह अंमलबजावणीला घेवुन या बैठकीदरम्यान आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी महत्वपुर्ण सुचना केल्यात. वृक्ष लागवड कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करीता एक ते दिड फुट किंवा स्थानीक परिस्थीतीनुसार उंच, दर्जेदार, गुणवत्तापुर्ण रोपांची उपलब्धता, निधीची उपलब्धता, येणा-या अडचणी दुर करणे आणि संबंधीत जबाबदारी पुर्णत्वास नेण्यासाठी नियोजन, समन्वय, अंमलबजावणी आणि सनियंत्रण करण्याला घेवुन सुध्दा या बैठकीदरम्यान आ. सौ. सुलभाताई यांचे वतीने संबंधीतांना निर्देशित करण्यात आले .  या बैठकीमध्ये आमदार सौ. सुलभाताई खोडके समवेत सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता - एस.पी. थोटांगे, उपअभियंता - एन.आर. देशमुख, उपविभागीय अभियंता - एस.झेड काझी, सहायक अभियंता - विनोद बोरसे, यश खोडके, मनपाचे उद्यान अधिक्षक - मुकुंद राऊत, अमरावती गार्डन क्लबचे अध्यक्ष - डॅा. दिनेश खेडकर, सचिव - डॅा. रेखा मग्गीरवार , कोषाअध्यक्ष - सुभाष भावे, कंत्राटदार - सागर जाणे, निखिल फुटाणे आदी उपस्थीत होते.