अकोला जिल्हा प्रतिनिधी पंकज शिरसाट
जुने शहरातील एकमेक क्रीडा मैदान म्हणून प्रसिद्ध असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असून सुद्धा घाणीचे विळख्यात सापडलेले आहे सर्वत्र पाणी साचून दुर्घन्धी पसरली आहे सर्वत्र कचऱयाचे ढिक दिसतात. तसेच मैदानाच्या बाजूला सांड पाणी साचून मैदान खराब झाले आहे तरी मैदानाकडे लक्ष ठेऊन त्वरित मैदानाला आवार भिंत बांधण्यात यावी जेणे करून घाण होण्यास आवर बसेल व जनावरांचे मुक्त संचार थांबेल मैदानाच्या कडेला वृक्ष लागवड करण्यात यावी तसेच मैदानाची
एक लेवल करून युवकास खेळण्यात योग्य असे करण्यात यावे तसेच सांडपाण्याकरिता कायम स्वरूपी व्यवस्था करण्यात यावी व जेष्ठ नागरिकांकरिता वॉकिंग ट्रक करण्यात यावा व सर्व बाजूला स्ट्रीट लाईट ची व्यवस्था करण्यात यावी या मागणीचे निवेदन पश्चिम झोन क्षेत्रीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत महानगर पालिका आयुक्त साहेबांना देण्यात आले यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित मनपा अधिकारी कर्मचारी यांना मा पश्चिम झोन क्षेत्रीय अधिकारी यांनी त्वरित दिले . युवा स्वाभिमान पार्टी चे युवक जिल्हा अध्यक्ष सागर खंडारे यांनी निवेदन दिले यावेळी पार्टी सर्व पदा अधिकारी जिल्हा महासचिव आकाश जंजाळ कोषाध्यक्ष धनराज बागळे संघटक शरद तिवारी सचिव नितीन ढगे अकोला तालुका पूर्व अध्यक्ष शुभम इंगळे अकोला तालुका पश्चिम अध्यक्ष सचिन जंजाळ योगेश वानखडे अमोल तायडे सुशील तेलगोटे चिकू वानखडे मंगेश इंगळे सौरभ डोंगरे विनोद सरदार दादू पाखरे अमित गजभिये गोपाल पाटील श्वेब अली सलमान यावेळी उपस्तित होते.
