गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
तालुका एरंडोल येथील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे तालुकाध्यक्ष यांना महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्री मच्छिंद्र पाटील हे समाजसेवक असून असून सध्या भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी उज्वलाताई पाटील
या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असून त्यांनी एरंडोल विधानसभा मतदारसंघात अनेक गरजू व गरीब लोकांना आरोग्याची मदत करून आरोग्यसेवा केलेले आहे मच्छिंद्र बापूंच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोसारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून संपूर्णया जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे त्यांनी रुग्ण सेवेकरिता श्री सद्गुरू कृपा हॉस्पिटल मुंबई यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील रुग्णांची सेवा केली आहे
