नाशिक येवला प्रतिनिधी माधव नेहे
येवला तालुका प्रहारच्या शिष्टमंडळाने काल राज्यमंत्री बच्चू कडू यांचे समोर तालुक्याच्या दृष्टीने महत्व असलेल्या पालखेड डाव्या कालव्याचे दिवसेंदिवस कमी होत जाणारे पाणी नेमके कुठं मुरते,त्यात कुणाचे अन कसे हितसंबंध गुंतलेत,तालुका सतत दुष्काळी असलेने सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठ्यातून सुमारे ५२%साठा येवला तालुक्यासाठी आरक्षित असताना आज एकूण लाभक्षेत्राच्या २०%च पाणी सिंचनासाठी उपलब्ध होत असून तालुक्याच्या हक्काचे पाणी नेमकं मुरते कुठे?आज अख्या राज्यभर बाष्पीभवन व वहनव्यय १५%च्या आसपास असतांना केवळ याच कालव्याचा वहनव्यय ८०%पर्यंत दाखविल्या जातो.
यावर सर्वपक्षीय अळीमिळी चेच धोरण गेल्या अनेक वर्ष बघायला मिळत असून कुणीही उघडपणे यावर बोलत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.यावर तालुका प्रहारने राज्यमंत्री बच्चू कडू यांचे कडे गाऱ्हाणं मांडल्याने त्यांनी यावर लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.तसेच एरंडगाव येथील पडीत आसलेली जलसंपदा विभागाची जागा व्यावसायिकांना गाळे बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी.
महात्मा फुले कर्जमाफी योजनेत तांत्रिक त्रुटी अभावी वंचित राहिलेले सुमारे ३०० शेतकऱ्यांची यादीच शिष्टमंडळाने राज्यमंत्री कडू यांचेकडे सादर केली .यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळास त्यांनी दिले.यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर,प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन,जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल फरताळे,किरण चरमळ,वसंतराव झांबरे,शंकर गायके,गणेश लोहकरे,ज्ञानेश्वर जगझाप,सचिन पवार,जगदीश गायकवाड, सागर गायकवाड,गोरख निर्मळ,संजय खांदे,अंकुश कदम, दत्तू खकाळे,सागर सुराणा,संतोष रंधे,वाशीम शेख,आदी उपस्थीत होते.
