योगेश नागोलकार @प्रतिनिधी पातूर
राहेर: पातुर तालुक्यातील ग्रामपंचायत चान्नी येथे ग्रामस्थ नागरिकांनी ग्रामपंचायत विषयी कितीक वेळा सांगितले असता चान्नी येथे विकास कामाकडे संबंधित अधिकारी आणी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाल्याने विकास कामामध्ये खंड पडला आहे.अनेक दिवसांपासून विकासाच्या योजना विस्थळीत पडल्याने विकास कामाला सुरुवात देण्यासाठी चान्नी येथील महीलांनी दिनाक:२/११/२०२० रोजी सोमवारी दुपारी पातूर येथे पंचायत समिती कार्यालयात महीलांचे ठिय्या आंदोलन करून गटविकास अधिकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन बारोकर,विठ्ठल ताले,भिभराव सोनोने, यांच्या नेतृत्वाखालील महीलांनी ठिय्या आंदोलन करण्यात आले चान्नी येथील ग्रामपंचायत स्तरावर अनेकांन नागरिकांकडे रेशन कार्ड नाहीत,शौचालय पण नाहीत, अनेक दिव्यागाणा अनुदानापासून वंचित राहावे लागत आहेत.काहीना तर घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे.अशा अनेक तक्रारी काल चान्नी च्या महिलांनी गटविकास अधिकारी अधिकाऱ्यांकडे केलेल्या निवेदनात केल्या आहेत.या ग्रामपंचायतमध्ये अनेक शासकीय योजनांमध्ये निधिचा गैरवापर झाला असून अनेक योजनांमध्ये सुद्धा गैरवापर झाल्याचा आरोप चान्नी येथील महीलांनी निवेदनात केला आहे.शुद्ध पाणी योजना,मुख्यमंत्री पेयजल योजना,मशीन खरेदी व्यवहार,डिजीटल सार्वजनिक बांधकाम रस्ते, शेत रस्ते, कामांची चौकशी करावी,अशी मागणी काल निवेदनात करण्यात आली आहे. चान्नी येथील दिव्यांग रामदास काकड,यांनीसुद्धा अनेक वेळा पातूर पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी यांना पाच टक्के निधी वाटपाबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या असता सुद्धा त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.निवेदन देताना माहीला सुमन ढोरे,कोळीला ताले,पार्वती ताले,गौतमी इंगळे,गयाबाई निंबाळकर,सुनिता ताले,सविता ताले,सुनंदा ढोरे,उशा ताले,रेणुका निंबाळकर, सुर्यकांता ताले,प्रमिला निंबाळकर, गोकुळा ताले,वछला गाडगे,सिंधू ताले,अर्चना डांगे,शारदा ढोरे,पूनम जाधव,कुसुम पेटे,दिपाली गाडगे,विद्या ढोरे,सुलभा पेटे,वच्छला सोनवणे,नंदा अंबुलकर,सुचिता गांवडे,वृषाली ढोरे, अंजना डांगे,मेघा पेटे, ज्योती पेटे, सस्वती ताले,रामेश्वर जाधव, आदीचा या निवेदनात समावेश होता.यावेळी पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.अनंत लव्हाळे,यांनी चौकशी करून कारवाई करणार असे महीलांना सांगीतले.

