नंदकिशोर इंगळे अमरावती
धामणगाव विधानसभा मतदारसंघ हा ग्रामीण भागातील विभागला असून मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या आहेत. धामणगाव , चांदुर , आणि नांदगाव ख. या तालुक्यातील विजेच्या समस्येसंबंधी मा. ना. श्री. नितिनजी राऊत साहेब ऊर्जामंत्री यांची भेट घेतली. रब्बी हंगामाची सुरवात होत असून शेतकऱ्याचे यंदा झालेले नुकसान पाहता रब्बी पिकांवर शेतकाऱ्यांची दारोमदार आहे. रब्बी पिकाच्या ओलितासाठी मोठ्या प्रमाणावर विजेची मागणी आहे. मोठ्या प्रमाणावर अतिभारामुळे रोहित्र खराब होत असून अतिरिक्त रोहित्र धामणगाव विधानसभा मतदारसंघात जास्त प्रमाणात देण्याची मागणी केली. अतिरिक्त जास्त भर क्षमतेचे रोहित्र उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी केली .
कोरोना काळातील वाढीव वीजबिल माफ करण्याबाबत तसेच वीज ग्राहकाना दिलेल्या अतिरिक्त विजबिलात सवलत देण्याबाबत तसेच मतदारसंघातील आवश्यक असलेल्या उपकेंद्र , उपकेंदांची दर्जावाढ , प्रलंबित कृषी कनेक्शन , अशा विविध मागण्या लेखी पत्राच्या माध्यमातून केल्या. व त्याबाबत मा. मंत्री महोदयांकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले. यावेळी मा ना श्री विश्वजीत कदम साहेब , राज्यमंत्री सहकार कृषी व पणन ,दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंतभाऊ वानखडे उपस्थित होते.
तसेच माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण साहेब यांची भेट घेऊन अंजनवती- धामणगाव - देवगाव रस्ता व चांदुर रेल्वे येथील उड्डाणपूल या दोन कामांना गती देण्या संदर्भात चर्चा केली. तसेच बडनेरा- नांदगाव - यवतमाळ या रस्त्याला ADB अंतर्गत बांधकाम करणे तसेच धानोरा गुरव- पापळ -वाढोणा रामनाथ रस्त्याचा कामाला सुरावात करण्याबाबत चर्चा केली. प्रा. वीरेंद्र जगताप माजी आमदार धामणगाव विधानसभा
