Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

खावटी अनुदान गो बॅक गो बॅक खावटी अनुदान बोंबाबोंब मोर्चा

Responsive Ad Here

 सतीश पवार प्रतिनिधी बीड

दिनांक 02/12/2020 रोजी श्रीरामपूर येथे  प्रांत कार्यालयासमोर  एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने कोविड19(कोरोना)च्या नियमांचे पालन सर्व अंदोलकांनी करून  मा.शिवाजीराव गांगुर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली " बोंबाबोंब "अंदोलन करण्यात येईल. अंदोलक एकत्र येण्याचे ठिकाण मार्केट यार्ड,श्रीरामपूर. वेळ सकाळी 10वाजता.

           मागण्या:- सारंगखेडा येथील आदिवासी मुलीची निघृण हत्या करणार्या आरोपीस सक्त सजा द्यावी.सारंगखेडा येथील अन्याय अत्याचार ग्रस्त कुटूंबास पंतप्रधान असहाय्यता निधी,मुख्यमंत्री असहाय्यता निधी  मधून 25 लाख रुपये मदत,शासकीय 5 एकर जमीन, 500 चौ.फु.घर इत्यादी मदत करावी.भूमीहीन सबलीकरण योजनेचा निधी 25 लाख रुपये करून ज्या आदिवासी कुटुंबाने शासनास जमिन देण्यासाठी शेतकरी तयार केला आहे. त्याच आदिवासी कुटूंबास त्या शेतकर्याची जमिन शासनाने द्यावी. व चिठ्ठी पध्दत बंद करण्यात यावी खावटी अनुदान 4000 ₹.ऐवजी 20,000₹.करून 

आदिवासी कुटुंबाच्या बॅंक खात्यात जमा करा.खावटी अनुदान सरसकट सर्व आदिवासी कुटुंबाना वाटा 2000₹च्या किराणा साठी दलालांच्या घशात घालायला ठेवलेले शेकडो कोटी रुपये रदद करून आदिवासी कुटुंबांना द्यावी. व किराणा खरेदीच्यानिविदा रद्द करावी.खावटी अनुदान  साठी हा कागद आणा,हे बॅंक खाते नको , भूमीहीन दाखला आणा. हेच करा ,कुपन आणा,आधार आणा,खाते लिंक करा, हे सरकारचे नाटकं बंद करा कागदपत्र  जे उपलब्ध आहेत.तेच ग्राह्य धरून ग्राम पंचायत ठराव करून खावटी अनुदान  वितरीत करा.आधार, कुपन,जातप्रमाणपत्र,बॅंक खाते ज्या कुटुंबात आहे त्यांना खावटी अनुदानातून वगळू नका.खावटी अनुदाना च्या नावाने मानसिक त्रास होत आहे.रोजंदारी बुडत आहे.लेकरं उपाशी ठेवता येत नाही याची जाणीव ठेवा माणसिक त्रास तात्काळ बंद करा भिक नको पण कुत्र आवरा रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र, भूमीहीन दाखला, आधार, आदिवासींच्या घरात तयार होत नाही.शासनाने तात्काळ घरपोहच या सुविधा देण्याची हमी घेऊन मगच खावटी अनुदान वितरीत करावे.आदिवासी शेतकरी कुटूंबाना सुद्धा खावटी अनुदानाचा लाभ द्या ह्या मागण्यासाठी सरकार तयार असेल तरच अंदोलन शिथिल करण्यात येईल अन्यथा प्रत्येक तहसिल, प्रांत कार्यालयासमोर, जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर तिव्र स्वरूपाचे अंदोलन छेडणार खावटी गो बॅक खावटी गो बॅक बोंबाबोंब महा मोर्चा. सर्व आदिवासी समाजाने तोंडाला मास्क,रूमाल,व 10फुटाचे अंतर एकमेकांनमध्ये ठेवून अंदोलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.