हरीश हजारे प्रतिनिधी अमरावती
आरोग्य विभाग पंचायत समिती भातकुली यांचे मार्फत कूष्ट रोग आणि क्षय रोग तपासणी मोहीम दि. 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यन्त भातकुली तालुक्यातील संपूर्ण गावात राबविण्यात येत आहे.तालुका आरोग्य अधिकारी प्रतिभाताई बोरखडे तसेच आरोग्य विस्तार अधिकारी प्रभाकरजी तीनखेळे कूस्ट रोग तंत्रज्ञ पल्लवीताई सपकाळे यांनी ही तपासणी मोहीम कशी राबविण्यात येईल याबद्दल दिली संपूर्ण माहिती.
भातकुली / आजही समजामध्ये कुष्ठरोग ला सामाजिक कलकं समजला जातो आणि रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे त्याचबरोबर क्षय रोगाचे रुग्ण देखील वाढत आहे तसेच हे आजार संसारगजण्य असल्यामुळे त्यांच्यामुळे इतर लोकांना संसरग होण्याची शक्यता असते त्यामुळे अश्या प्रकारच्या मोहीम राबविण्यात अत्यंत आवश्यक असते.
त्या अनुसरून अश्या प्रकारे मोहीम दि 1डिसेंबर ते दि 16 डिसेंबर पर्यन्त संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येत आहे. त्या मोहीम चे नाव सक्रिय कुशटरोग व नियमित सनीयंत्रन 2020/21 असे आहे.
ही मोहीम तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती भातकुली यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे. या मोहिमे मध्ये तपासणी करण्यासाठी स्थानिक गावातील आशा वर्कर आणि आरोग्य सेवक तथा आरोग्य कर्मचारी हे प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करतील अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभाताई बोरखडे, आरोग्य विस्तार अधिकारी प्रभाकरजी तीनखेडे, आणि कुशटरोग तंत्रज्ञ पल्लवीताई सपकाळे यांनी आज पंचायत समिती भातकुली येथे जनजागृती करण्यासाठी माहिती सादर केली आहे.
