पालकमंत्री पाठोपाठ स्थानिक आमदारांना भेटले शिष्टमंडळ. एरंडोल येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने नुकतीच पाळधी येथे जाऊन पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांना निवेदन देऊन एरंडोल शहरात शासकीय ट्रामा सेंटर उभारण्याची आग्रही भूमिका मांडली होती आज दिनांक 19 रोजी एरंडोल येथे आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना एरंडोल शहर हे तालुक्याचे ठिकाण असून रस्ते अपघात अतिगंभीर रुग्णांवर व आपत्कालीन स्थितीत गंभीर रुग्णांवर परिणामकारक आरोग्य सुविधेसाठी शासकीय ट्रामा केअर सेंटर उभारण्यासंदर्भात पुढाकार घेण्याची मागणी केली याप्रसंगी मेडिकल असोसिएशनचे तालुका अध्यक्ष डॉक्टर सुधीर काबरा यांनी एरंडोल शहरात जर ट्रामा सेंटर च्या उभारणीस मंजुरी मिळाली तर सद्य स्थितीत असलेली प्रशिक्षित व तज्ञ डॉक्टरांची कमतरता साधनसामुग्री प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्यसेविका रुग्णवाहिका आदी समस्या दुर होऊन शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने व तालुक्याच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपायोजना होईल असे सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून भावना असल्याचे म्हटले. याप्रसंगी दिलेल्या निवेदनावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश सिंग परदेशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय अण्णामहाजन, शिवसेना उपजिल्हा संघटक रमेश अण्णा जगन्नाथ महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर बाबुराव निंबाळकर माजी नगराध्यक्ष राजेंद्र आबा दोधु चौधरी . शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, पंचायत समितीचे सभापती अनिल भाऊ महाजन, उपसभापती विवेक दादा पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व नगरसेवक डॉ सुरेश कालेश्वर पाटील , माजी सभापती शालिग्राम अर्जुन गायकवाड, आनंदा चौधरी छोटू भगत,मनसे तालुका अध्यक्ष विशाल रवींद्र सोनार, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष तथा राज्यशासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर, नितीन सुभाष बिर्ला,नगरसेवक अतुल देविदास महाजन डॉ नरेंद्र ठाकूर परेश किशोर बिर्ला गणेश चौधरी , शिवसेना पदाधिकारी रवींद्र चौधरी , विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश दादा पाटील . रविभाऊ जाधव, ठाकूर सर निपाने, सुनीलभाऊ मराठे यांच्यासह शहरातील राजकीय शिक्षण सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या सह्या आहे सर्वजण या वेळी उपस्थित होते व त्यांनी आग्रही भूमिका मांडली दरम्यान यासंदर्भात ची शहरवासीयांची व तालुका व त्यांची भावना लक्षात घेऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेश भैय्या टोपे साहेब यांच्याशी देखील भावना व्यक्त केल्या आहेत. एरंडोल पारोळा मतदार संघाचे आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांनी सर्व शिष्टमंडळाचे सर्वपक्षीय तसेच सर्व क्षेत्रिय मान्यवरांच्या भावना समजून घेऊन तातडीने लगेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोजीराव चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले.एरंडोल शहरासह तालुका वाशी यांच्या स्वप्नातील शासकीय ट्रामा केअर सेंटर आरोग्याच्या दृष्टीने सारेजण केव्हा अस्तित्वात येईल याकडे लक्ष ठेवून आहेत... अशी सर्वपक्षीय एरंडोल वाशी यांची मागणी आहे✍️✍️✍️✍️ गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र
Vedio
Labels
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सामाजिक
- स्त्रीशक्ती

