जामनेर -प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्यात पहिले पोलीस निरीक्षक पदी अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्र येथून आलेले राहुल सोमनाथ खताळ यांनी पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पदाचा नुकताच पदभार स्वीकारला असून ते पहिले पोलीस निरीक्षक म्हणून परीक्षणात रुजू झाले आहे.
पहूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 79 गावे असून लोकसंख्या मोठी असल्याने येथे पोलिस निरीक्षक पदासाठी अनेक दिवसांची मागणी होती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या आदेशाने राहुल खताळ यांना पहूर पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे यापूर्वी आपल्या पंधरा वर्षाच्या कालखंडात रत्नागिरी गडचिरोली नवी मुंबई ई अकोला आदी ठिकाणी सेवा केली असून राज्य लोक सेवा आयोगाच्या परीक्षेतून ते पोलिस दलात दाखल झाले आहेत कायद्याच्या चौकटीत राहून कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येणार आहे असे दैनिक सामना शी बोलताना त्यांनी सांगितले.
