Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कारागृहातील फरार आरोपी सुशील मगरे अखेर जेरबंद

Responsive Ad Here

 जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक राहुल खताळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुप्त माहितीवरून आज सकाळी जळगाव येथील कारागृहातील फरार आरोपी सुशील अशोक मगरे लेले नगर पहुर याला पोलिसांनी घरातून पळून जात असताना केले जेरबंद

जळगाव येथील जिल्हा कारागृहातून रक्षकाच्या कपाळाला बंदूक लावून 25 जुलै रोजी फरार झालेल्या तीन कैदी यापैकी मुख्य सूत्रधार व बड तर्फे पोलीस कर्मचारी सुशील अशोक मगरे लेले नगर पहूर तालुका जामनेर या फरार कैद्याला जामनेर तालुक्यातील पहुर येथे पोलिसांनी पळून जाण्याच्या बेतात असताना शिताफीने आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास केली अटक या पोलिस त्यांच्या धडाकेबाज कामगिरीने सर्वत्र कौतुक होत आहे.

दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या सुशील अशोक मगरे या बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याने कारागृहातील गौरव विजय पाटील आणि सागर संजय पाटील यांच्यासह 25 जुलै रोजी रक्षकाच्या कपाळाला बंदूक लावून जगदीश पाटील यांच्या मदतीने फरार झाले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महिना भरा नंतर गौरव पाटील सागर पाटील तसेच जगदीश पाटील यांना देखील अटक केली होती त्याच बरोबर त्यांना पळून जाणाऱ्या मदत करणारा इतर पाच ते सहा जनावरे देखील अटक केली आहे याप्रकरणी हे  सर्वजण कारागृहात यातील मुख्य सूत्रधार असलेल्या आणि बड तर्फे पोलीस कर्मचारी सुशील अशोक मगरे राहणार पहूर तालुका जामनेर पोलिसांना चकवा देत होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विविध पथक त्याच्या मागावर होते मुंबई पुणे गुजरात आदी ठिकाणी पोलिस त्याचा शोध घेत होते आणि आज रविवार रोजी 29 नोव्हेंबर रोजी पवार पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना गोपनीय माहिती मिळाली असता त्यानुसार त्यांनी पहूर येथील लेले नगर भागातील त्याच्या घरावर धाड टाकली असता त्याला रंगेहात पकडण्यात आले  पोलीस आल्याची सुशील मगर यांना कुंकू लागतात घराच्या वरून गच्ची वरून 25 फुटावरून उडी मारून पळून जाण्याच्या बेतात असताना पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर ठाकरे अनिल राठोड या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले त्यांची झाडाझडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये खाली गावठी कट्टा एक सुरा चार हजार रुपये रोख रक्कम मोबाईल चे तीन सिमकार्ड असे साहित्य त्याच्याजवळ आढळून आले पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता कुठले आक्षेप आढळून आले नाही पहूर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून पोलीस ठाण्यात जमा केले व अटक केली व त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आज जामनेर न्यायालयात  त्याला हजर करण्यात येणार आहे  या कारवाईची माहिती जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांना देण्यात आली असून त्यांनी पहूर पोलिस  यांचे अभिनंदन केले आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल खताळ पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे उपनिरीक्षक संदीप चेडे पोलीस हवालदार भरत लिंगायत पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख अनिल राठोड ज्ञानेश्वर ठाकरे यांनी ही कारवाई केली या सर्वांचे नागरिकांनी कौतुक केले आहे

 सुशील मगरे यांची  पार्श्वभूमी 

 आरोपी कैदी सुशील अशोक मगरे हा 12 सप्टेंबर 2017 रोजी जळगाव तालुक्यातील मसावद येथील दूर क्षेत्र ड्युटीवर असताना गुन्हेगारांची टोळी तयार करून नेरी औरंगाबाद रस्त्या वरील माळपिंपरी जवळ उभ्या असलेल्या ट्रक चालकाला बंदुकीचा धाक दाखवून लूट केली होती याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता 19 सप्टेंबर रोजी अटक केली होती तर दुसरा गुन्हा रिवाल्वर धाक दाखवून पुणे शहरातील कोथरूड मधील पेठे ज्वेलर्स मधून दहा लाख 19 हजार 600 रुपये किमतीचे सोने ची लूट केली होती याठिकाणी एकाने गोळीबार सुद्धा केला होता त्याला 25 नोव्हेंबरला सुशील मग यांना अटक केली होती.