गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल येथे नगर पालिका तर्फे माझी वसुंधरा रैली चे आयोजन नगर पालिका कार्यालय ते धरणगाव चौफुली पर्यंत करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त नगर अध्यक्ष-रमेश सिंह परदेशी उपाध्यक्ष योगेश महाजन, मुख्य अधिकारी किरण देशमुख, प्रशासन अधिकारी संजय ढमाळ, नगर सेवक नितीन महाजन,दसरथ चौधरी, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व नगरपालिका चे कर्मचारी रैली मध्ये उपस्थित होते.
या अभियानात अंतर्गत शहरातील इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थी तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी सोबत सदर फेरी काढण्यात आली ही रैली नगर पालिका कार्यालय ते धरणगाव चौफुली पर्यंत करण्यात आली होती.रैली सोसल डिस्टेनस ने मास्क लावून करण्यात आली.
यामध्ये माझी वसुंधरा या घटकांतर्गत येणारे जल,वायु, अग्नी, भूमी, आकाश या घटकांवर प्रदूषण मूळे होणारे दूषपरिणाम रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली तसेच दर सोमवारी विना-वाहन दिवस अथवा सायकल दिवस म्हणून संपूर्ण एरंडोल शहरात घोषित करण्यात आला असून सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना जाहीर आव्हान करण्यात आले.
