Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मलकापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महामानवाला अभिवादन

Responsive Ad Here

 किरण वाघ प्रतिनिधी बुलढाणा

       भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष बुलढाणा जिल्हा व भैरव फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे मलकापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली.

       संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान च्या माध्यमातून समस्त स्त्रियांना अधिकार बहाल केले व या देशातील प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीला न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या आधारित अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आणि  संपूर्ण देशाला एकसंघ ठेवले असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व भैरव फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांनी केले.



याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्ष व भैरव फाऊंडेशनचे पदाधिकारी धनश्रीताई काटीकर पाटील जिल्हाध्यक्ष रासप, प्रा प्रकाश थाटे जिल्हा संघटक रासप, करणसिंह सिरसवाल युवा जिल्हाध्यक्ष रासप, सय्यद ताहेर जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी, ख्वाजा कुरेशी तालुका उपाध्यक्ष रासप, संतोष वानखेडे शहराध्यक्ष रासप, विजय वानखेडे महाराष्ट्र कोषाध्यक्ष भैरव फाउंडेशन, रवींद्र वाकोडे प्रदेश उपाध्यक्ष भैरव फाउंडेशन वाहतूक शाखा, अनंत दिवनाले  जिल्हाध्यक्ष भैरव फाउंडेशन, रोशन वाकोडे जिल्हा उपाध्यक्ष भैरव फाउंडेशन, मनीष शर्मा शहराध्यक्ष फाउंडेशन, धम्मपाल इंगळे शहर उपाध्यक्ष  मलकापूर, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते