Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राजूर येथील सरपंच पदाच्या आरक्षणावर आक्षेप

Responsive Ad Here

 किरण वाघ प्रतिनिधी बुलढाणा

              मोताळा तालुक्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकीकरिता सरपंच पदाकरिता आरक्षण काढण्यात आले. त्यात सन 2022 करिता ग्रामपंचायतीचे आरक्षण सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आले. यावर राजूर येथील अनुसूचित जातीच्या बांधवांनी आक्षेप नोंदविला आहे.

राजूर येथील अनुसूचित जातीची लोकसंख्या हजार ते बाराशे च्या आसपास असून त्यातील मतदान संख्या 600ते 700 च्या घरात आहे ,असे असूनही अनुसूचित जातीचा एकदाही सरपंच झालेला नाही किंवा आरक्षण तक्ता पाहिला असता यापूर्वी कधीही सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेले नाही.सरपंच पदाच्या मागील आरक्षणाचा आढावा घेतला असता सर्व साधारण व नामाप्र आरक्षण अगोदरच झालेले आहे. यावेळेस सरपंच पदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण अपेक्षित होते .

        सामाजिक समतोल साधण्याकरता यावेळेस अनुसूचित जातीचे आरक्षण अपेक्षित होते. त्याकरता ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण नव्याने सर्वसाधारण ऐवजीअनुसूचित जाती साठी जाहीर करावे अशी मागणी निवेदनाद्वारे रतन गवई ,शुभम मेढे ,मारुती मेढे, अनील मेढे ,नितीन गवई , शुभम इंगळे ,वासुदेव मेढे,शीद्धोधन मेढे, आनंदा मेढे व समस्त समाजबांधवानी  केली आहे.