Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मुख्यमंत्र्यांनी केली समृध्दी महामार्गाची पाहणी पाहिलाच विदर्भ दौरा

Responsive Ad Here

नंदकिशोर इंगळे तालुका प्रतिनिधी नांदगांव खंडेश्वर

शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांनी आज नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेसवे चा पाहणी दौरा केला.  ७५० किलोमीटर अंतर असलेला समृद्धी  महामार्ग हा संपूर्ण प्रकल्प ६५ हजार कोटीचा असून ६०% काम ऑक्टोंबर पर्यंत पूर्ण झाले अाहे. २७ तालुक्यातून व ३५० गावातून हा महामार्ग गेला आहे. 


उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यंमंत्री झाले तेव्हापासून त्यांचा विदर्भाचा हा पहिलाच दौरा आहे.११:३० ला त्यांच नागपूर वरुन शासकीय हेलिकॉप्टर ने मंगरूळ चव्हाळा येथे आगमन झाले. यादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांनी आपल्या मोटार वाहनाच्या ताफ्यासह रस्त्यावरून गस्त घालत पाहणी केली. रस्त्याची पाहणी करून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून नागपूर ते शिर्डी महामार्ग मे २०२१ पर्यंत मोकळा होईल असे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी 12:00 वाजता औरंगाबाद करिता रवाना झाले. 

या कार्यक्रमादरम्यान अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड,   माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.