नंदकिशोर इंगळे प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर
जगप्रसिद्ध कन्याकुमारी शिलास्मारकाच्या शिल्पकाराच्या जन्मगावाचे उद्धारक, विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीचे माजी युवाअध्यक्ष, फुले-शाहू-आंबेडकर स्मृती गौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेले, जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे कर्तव्यदक्ष युवा पत्रकार, बहुचर्चित सम्राट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विद्यार्थीरत्न सुरज श्रीपाल सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जिवनावरील आधारित पुस्तकांचे वाटप करून विविध उपक्रमाने उत्साहाने साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, टिमटाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्रीपाल सहारे व सौ. कमल श्रीपाल सहारे यांचे सुपुत्र सुरज सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. गावातील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावरील आधारित पुस्तकांचे वाटप करण्यात आले सोबतच सामुहिक पुस्तक वाचन करून उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला. सोबतच परिसरातील शेतकरी बांधवांना शेतीविषयक माहिती देणा-या पुस्तकांचे वाटप करून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
कोरोना मुळे विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण अडचणीत आले असताना लॉकडाउन संपल्यानंतर मोकळ्या हवेत श्र्वास घेतांना महापुरुषांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात रुजवावे यासाठी विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावरील आधारित पुस्तकांचे वाटप करून सामुहिकपणे वाचन करण्यात आले. यामध्ये महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पेरियार रामस्वामी, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, नारायणा गुरू, एकनिष्ठ एकलव्य, डॉ अब्दुल कलाम, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सम्राट अशोक, सम्राट हर्षवर्धन, तथागत गौतम बुद्ध आदी पुस्तकांचे वाटप करून सामुहिकपणे वाचन करण्यात आले तसेच शेती व त्यासंबंधीच्या समस्या निवारण करणारी पुस्तके परिसरातील शेतकऱ्यांना देऊन वाढदिवसानिमित्त त्यांचा सुद्धा आशीर्वाद घेण्यात आला. या कार्यक्रमाकरिता सम्राट फाऊंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले असून स्तुत्य उपक्रम राबविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांकडून सुरज सहारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमाकरिता प्राची सहारे, नेहा सहारे, अंजली तिडके, यशार्यन सहारे, विवेकभूशन सहारे, शुद्धोधन गवई, जयपियुष सहारे, पुरुषोत्तम सहारे, जान्हवी सहारे, संदेश वैद्य, यथार्थ भडके, आयुष चौधरी, रितेश तिडके आदी विद्यार्थ्यांप्रमाणेच उपस्थित महिलावर्गांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. उपस्थितांना गोड खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
